चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

63

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 मार्च) :- चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची दोरीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जिवती तालुक्यातील करणकोंडी येथे दिनांक ०९ मार्च रोजी सकाळी पहाटे ०३ ते ०३:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

       सगुणा अनिल चव्हाण (२६) रा. करणकोंडी असे मृत महिलेचे नाव असून अनिल राम चव्हाण (३०) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सगुणा ही मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे पाठविण्यात आले होते आक्रोशपुर्ण व तणावपूर्ण वातावरणात करणकोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्यक महिलेला एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजते .

      फिर्यादी राजकुमार रावण राठोड (३०) रा. घारपाणा यांनी पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची तक्रार जिवती पोलिसात दिल्यावरून अनिल राम चव्हाण यांचे विरुद्ध अपक्र ३५/२०२४ भादवी कलम ३०२ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंदू,उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व फरार असलेल्या आरोपी पती अनिल चव्हाण यांना शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे.पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार दारासिंग राजपूत करीत आहे.