चंदनखेडा नगरी प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने शोभायात्रेने दुमदुमली

🔹हनुमान मंदिर सिताबर्डी चंदनखेडा चा उपक्रम

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर.(दि.23 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे दिनांक २२ जानेवारी २०२४ सोमवार ला. प्रभू रामचंद्र मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताचे औचित्य साधून हनुमान मंदिर सिताबर्डी चंदनखेडा यांनी प्रभू श्रीराम यांची गावातुन ढोल तासाच्या, लेझीम पथकाच्या,टिपर्या,वारकरी भजनांच्या, प्रभू श्रीरामाच्या जयघोषात संपूर्ण गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी रमेश चौधरी, विठ्ठल हनवते, गुलाब भरडे,बबन निखाते , शामसुंदर वाघ, शरद श्रीरामे ,संजय भोयर,गुलाब निखाते, गजेंद्र रणदिवे, संजय दोहतरे, चंपत भरडे, हनुमान जांभुळे, विशाल हनवते,नयन जांभुळे, मनोहर हनवते,समिरखान पठाण, शाहरुख पठाण, रविंद्र मेश्राम, प्रभाकर दोडके, मंगेश हनवते, प्रज्वल बोढे, शंकर दडमल, दिलिप ठावरी,रोशन चौधरी, प्रविण भरडे, संदिप चौधरी, गणेश जिवतोडे, नंदकिशोर जिवतोडे, भालचंद्र नन्नावरे,जिवन मुडेवार, घनश्याम कोसुरकार,गावातील भंजन मंडळ, प्रतिष्ठित, जेष्ठ, महिला भगीनीं, तरुण वर्ग, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारच्या वेळेत नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व शौर्य क्रिडा मंडळ,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा सप्ताह चे औचित्य साधून व प्रभू रामचंद्र मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताचे औचित्य साधून हनुमान मंदिर सिताबर्डी येथे रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी गावातील योगिताताई बोढे,लताताई नन्नावरे, अमृताताई कोकुडे, पुजाताई लुले,मेघा शेंन्डे, रुपाली शेंन्डे,प्रणिता जिवतोडे,स्वेता भोस्कर,पुजा पांढरे,मिनल दडमल,तन्वी हनवते,आदि महिला, भगीनीं, तरुणनी, शाळकरी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभागी होवून स्पर्धेत भाग घेतला.कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.उपस्थित सर्वांचे आभार रमेश चौधरी यांनी मानुन कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.