महिला पालक हळदी कुंकू व बाल आनंद मेळावा,निशुल्क रोगनिदान शिबिर कार्यक्रम संपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 जानेवारी) :- PM SHRI जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा *”महिला पालक हळदीकूंकू व बाल आनंद मेळावा”* आयोजन दि.18 जानेवारी 2024 गुरुवारला करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नयन जांभुळे,सरपंच हे होते तर,अध्यक्ष म्हणून मा.अनिल कोकुडे शा.व्य.स. हे होते तर सौ.रुपाली शेंडे उपाध्यक्षा,मेघा शेंडे,हसिना कुळसंगे,आशियाना शेख , सौ.अनिता आईंचवार मु.अ.तसेच सर्व शिक्षक तथा अनेक पालक प्रतिनिधी ह्यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

      विद्यार्थ्यांनी ३९ खाद्य पदार्थांची विविध पदार्थ विक्रींचे स्टाँल लावले होते,उपस्थित सर्व पालक,गावकरी!युवा-युवती व विद्यार्थी यांनी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला,यातून विद्यार्थ्याना पाककलेबरोबर,गणितीय संकल्पनांची विविध उकल या बाल मेळाव्यातील व्यवहारातून कळली.जवळपास १६५००/- रुपयाची उलाढाल ह्या मेळाव्यातून झाली.सहाभागी विद्यार्थ्यांना यातून ख-या कमाईच्या पैशाचे महत्व पटले,गणितीय संकल्पना,भागभांडवल, नफा-तोटा,बाकी शिल्लक,गुंतवणुक हे व्यवहाराबाबतचे प्राप्त पुस्तकी ज्ञानाचे प्रात्यक्षिकातून संकल्पना कळल्या.

निशुल्क रोगनिदान शिबिर आयोजन :- ग्राम पंचायत चंदनखेडा येथे गगन मलिक फाऊंडेश द्वारा ग्रा.पं.सभागृहात विविध रोगावर निशुल्क रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,हाडाचे दुखणे,डोळे,अँसिडीटी,गँसेस,पोटाचे विकार,स्त्रियांचे विविध रोग,मुळव्याध,किडणी क्रियाशिलता,गुडघ्याचे आजार इ.आजारांचे निशुल्क निदान या शिबिरात करण्यात आले.जवळपास ४०० रुग्नांनी या शिविराचा लाभ घेतला. सरपंच नयन जांभुळे यांच्या कल्पक विचारातून व सहकार्यातून शिबिर यशस्वी झाले.सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

महिला मेळावा व हळदी कुंकू :- आज शाळेमध्ये महिला पालकांचा हळदीकुंकू कार्यक्रम व स्पर्धा तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रुपाली शेंडे ,प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका अनिता आईंचवार प्रमुख अतिथी व मार्गदर्शक होत्या.यावेळी महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विजेत्यांना बक्षियसे प्दान करण्यात आली,सर्व २००पालक महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग दाखविला,या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.अर्चना कुंभारे यांनी तर आभार सौ.प्रतिभा गुंडमवार यांनी मानले.सर्वज शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

        शाळेने घेतलेल्या उपक्रमाचे पाक वर्ग व समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.