तलाठी परीक्षा देवून वरोरा येथे बस अभावी अडकलेल्यासाठी सरसावला विकी कोरेकर

▫️करून दिली चिमूर साठी पर्यायी व्यवस्था 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.15 सप्टेंबर) :- चिमूर तालुक्यातील काही परीक्षार्थी चंद्रपूर येथे तलाठी परीक्षा देवून वरोरा येथे आले असता त्यांना बस किंवा इतर वाहन मिळाली नाही. तेव्हा स्वराज निकोडे यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या सानिध्यात व प्रवाहात असलेले विकी कोरेकर यांचेशी संपर्क करून वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तेव्हा विकी कोरेकर यांनी वाहन उपलब्ध करून दिले. 

    चिमूर तालुक्यातील २६ परीक्षार्थी चंद्रपूर येथून तलाठी परीक्षा देवून वरोरा येथ पर्यंत आले. परंतु चिमूर कडे येण्यासाठी बस किंवा इतर वाहन मिळाले नाही. ते ताटकळत अडकले होते. तेव्हा स्वराज निकोडे यांनी विकी कोरेकर यांचे शी संपर्क करीत वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

   विकी कोरेकर यांनी त्यांचे जावई शेगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत श्री डूकरे यांचे शी भ्रमण ध्वनी वरून संपर्क करून वरोरा येथे अडकलेल्या तलाठी परीक्षार्थी यांची गंभीर समस्या सांगितली असता डुकरे जी यांनी तात्काळ वाहन उपलब्ध करून दिले. सुखरूप परीक्षार्थी आपल्या घरी पोहचले. परीक्षार्थी यांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिल्या बद्दल विकी कोरेकर यांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले.

“मदत व सहकार्याची भूमिका करणाऱ्या विकी कोरेकर यांचे अभिनंदन”.