प्रबोधन मंडळ शेगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार Meritorious students felicitated by Prabodhan Mandal Shegaon

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.24 जुलै) :- प्रबोधन मंडळ शेगाव बु ता. वरोरा जि.चंद्रपूर 23/07/2023 ला सत्कार गुणवंताचा कार्यक्रम लक्ष्मी लाॅन/भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा श्री प्रकाश महाकाळकर साहेब गट शिक्षणअधिकारी पंचायत समिती भद्रावती , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री प्राध्यापक धनराज आस्वले सेवानिवृत्त प्राध्यापक भद्रावती, प्रमुख उपस्थिती :- श्री प्रकाश जी पदमावर.

डॉ खोब्रागडे साहेब, प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष विनोद चिकटे सर , मा श्री ढाकूणकर सर नेहरू विद्यालय प्राचार्य यांच्या हस्ते.प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी वर्ग चौथा आरव गजानन शेंडे, कु. राधा रामकृष्ण घोडमारे , वर्ग दहावा रोहित भगवान प्रसाद शर्मा , कु. प्राजक्ता नंदकिशोर कोकुडे , वर्ग बारावी कु करिना मुकेश वरवाडे.

अयान अल्ताक शेख .व विशेष सत्कारमूर्ती यशस्वी युवा युद्योजक मा श्री वैभव अविनाशजी पद्मावार, कु तनुजा गोपाळदास खोब्रागडे ,(PSI) गिरोला, कु कल्याणी दत्तूजी शिंगरु एम एम.सी बाॅटनी विषयात गोंडवाना विद्यापीठात प्रथम या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रबोधन मंडळाचे सचिव भालचंद्र लोडे सरांनी केले , व आभार प्रदर्शन डॉ प्रमोद बोंदगुलवार साहेब यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे मंडळी व विद्यार्थी व पालक वर्गांचे आभार मंडळाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रबोधन मंडळाचे सदस्य गण मानकर सर,शिरभैय्ये सर ,देवरावजी साखरकर, सुधीर चिकटे सर,भारत नरड, चंदु भाऊ जयस्वाल ,मनोज बोंदगुलवार, रुपेश फुटाणे,चंदुजी वाटकरजी , निलेश लोडे सर, ईश्वर नरड, राकेश कोटकर,वसंत निखाडे सर्व सदस्य उपस्थित होते.