अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या… शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 नोव्हेंबर) :- बदलत्या वातावरणामुळे अवकाळी पावसामुळे धान पिकांसह घतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातही शेतकरी राज भयभीत झाला असून पुन्हा एकदा नापिकिची अदाज वर्तविल्या जात आहे.शेतात असलेले पुंजने,सड्र्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने मत शेतकऱ्यांकडून वर्तविला जात असून यंदा खरिपाचे मोठे नुकसान होत आहे.नेहमीची परिस्थिती यंदाच्या हंगामा दरम्यान शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखी असून नापिकिची शक्याता वर्तविलि जात आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने चंद्रपूर जिल्हात पावसाने थैमान घातला आहे.पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. परिणामी, अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.त्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ नुकसान भरपाई द्या.अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे.चंद्रपूर जिल्हात त्याचा त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक व पशु नुकसान, घरांची गोठ्यांची पडझड झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतात सध्या गहू, हरभरा ही रब्बी पिके अंकुरलेली असून अनेक भागात तूर, कापूस,धान पिके काढणीच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.

त्यामुळे शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.२७,२८ नोव्हेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस त्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे.शेतकरी बांधवांनो, धीर धरा! बळीराजाला भावनिक साद,थोडा धीर धरा,अशी भावनिक साद शेतकरी नेते विनोद उमरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घातली आहे.