आतिश भलमे यांची त. मु. अध्यक्षपदी निवड

58

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.31 ऑक्टोबर) :- येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय चारगाव बू. येथे नुकतीच आमसभा पार पडली तर या आमसभेमध्ये अनेक विषयावरचे ठराव पारित करण्यात आले तर यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती च्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

तर हे पद घेण्याकरिता अनेक नवं यूवकानी आपली इच्छा दर्शवली .परंतु गावातील युवक कु. आतिश राजू भलमे यांची सर्वनगरिकांच्या गावकऱ्यांच्या सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी यांची निवड केली. सदर ही निवड ग्रामपंचायत कार्यालय चारगाव बू. चे सरपंच श्री योगीराज वायदुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुमार आतिश भलमे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने बद्दल सौ.शिलाताई घानोडे, सौ.अनिताताई टोंगे , राजू थुल पोलीस पाटील , गोपाल भलमे , बादल मेश्राम , पवन डाहुले, इत्यादींनी पुषगुच्छा देऊन स्वागत व अभिनंदन केले.