प्रहार तर्फे ठाणेदार मेश्राम यांचा सत्कार

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव बु. येथील पोलीस स्टेशन शेगाव चे युवा तडफदार झुंझार नेतृत्व करणारे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांचा आज कौतुकास्पद सत्कार प्रहार तर्फे करण्यात आला.. विशेष म्हणजे स्थानिक शेगाव बु. येथील मस्कऱ्या गणपती विसर्जन वरोरा तालुक्यात सर्वात मोठे असून गाव खेड्यात याची विशेष चर्चा असते शिवाय परिसरात हे विसर्जन प्रख्यात असल्याने दरवर्षी परिसरातील अनेक भाविक भक्त शेगाव येथील मसकऱ्या गणपती विसर्जन पाहण्या करिता मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

असंख्य जनता सर्वाधिक गणेश मंडळ बाहेरून आलेले नागरिक प्रत्येक मंडळात गाजावाजा इलेक्ट्रॉनिक रोषणाई डिजे व डीजे वर नाचणारी तरुणाई यांच्या कडून तसेच बाहेरून आलेल्या जनतेकडून या आनंद महोत्सव कार्यक्रमात कसलेले विपरीत प्रकार घडू नये किंव्हा या कार्यक्रमाला कसलेही गालबोट लागणार नाही. या करिता येथील ठाणेदार यांनी जागोजागी प्रत्येक चौका चौकात मोठ्या प्रमाण पोलीस बंदोबस्त ठेऊन गणपती विसर्जन शांततेत पार पाडले..

करिता या आनंद महोत्सवी मोलाचे सहकार्य करणारे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांचे कौतुक म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री शेरखान पठाण यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय बोंदगुलवार , अमोल दातारकर, राकेश भूतकर , गीताताई फुलकर, रंजनाताई सोनुने , सिंधू ताई मडावी , संगीता सोनुने , रजिया पठाण इत्यादी प्रहार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते….