धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्याद्वारे उभारण्यात आलेले धर्मपिठ भक्तिधाम पोहरादेवी येथे मा.ऊपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतले दर्शन 

🔸धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांचा आशीर्वाद घेतला व धर्मगुरूंनी त्यांचे भव्य सत्कार केले

✒️यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ (दि.13 ऑक्टबर ) :-  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब ओबिसी जनजागरण समारोप समारंभाच्या निमित्ताने पोहरादेवी येथे आले होते त्यावेळी धर्मपीठ भक्तिधाम येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दर्शन घेतले व धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांचा आशीर्वाद घेतला.

या वेळी धर्मगुरूंनी उपमुख्यमंत्री साहेबांचा धर्मपिठा कडुन भव्य सत्कार केला.यावेळी खासदार बोंडे साहेब,आमदार नीलयभाऊ नाईक,आमदार श्री.राजेंद्रजी पाटणी,व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड,प्रा.पि.टी.चव्हान सर, डॉ.मोहनभाऊ चव्हाण,अमेय नाईक,रूपेश जाधव,गणेश जाधव,किसन जाधव(सिंगदकर), श्यामभाऊ राठोड,बाळुभाऊ राठोड सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.