गडचिरोली जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची ३०वी व वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली

✒️स्नेहा उत्तम मडावी गडचिरोली(Gadchiroli प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.22 सप्टेंबर) :-  रोजी गडचिरोली जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली..

या सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री राकेश चांदेकर तर प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली चे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीश सोळंकी सर उपस्थित होते.

तर मंचावर पथसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती कविता नांदगाये, सचिव श्रीमती अंजू यावले, तज्ञ संचालक श्री अजय ठाकरे यांचेसह संचालक श्री गजानन गेडाम, संचालक सुहास मडावी, संचालक महेश कोला, संचालक श्री विजय कोराम, श्री चंद्रकांत बांबोळे, संचालक श्री स्नेहल संतोशवार, संचालक श्री दिलीप बारसागडे, संचालक डॉ. बाळू सहारे, संचालक श्रीमती रागिणी धात्रक, संचालक श्रीमती संध्या लोनबले उपस्थित होते.

सभेमध्ये पथासंस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.. तर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सभेमध्ये अनेक विषय चर्चिले गेले तसेच ठराव पारित करण्यात आले सभेचे सूत्र संचालन श्रीमती सपना आईंचवार यांनी प्रास्ताविक श्री गजानन गेडाम यांनी केले.