खर्रा खाल्ल्या नं चालकास चक्कर आली .अन् घडला मोठा अपघात The driver got dizzy when he ate it and there was a big accident

114

▫️महीलेचा जागीच मृत्यू तर मुलीची प्रकृती चिंताजनक(The woman died on the spot while the girl’s condition is critical)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 सप्टेंबर) :- नागभीड भुयार येथील लवकेश रेचनकार वय 34 वर्षे, पत्नी मिनाक्षी रेचनकार वय 29 वर्षे, व मुलगी मनस्वी रेचनकार वय 6 वर्षे हे भुयार वरुन सिंदेवाही मार्गे पाथरी चक विरखल येथे राखी सनानिमित्य दुचाकी वाहनाने जात होते.

परंतु सिंदेवाही मेंढा माल जवळ लवकेश रेचनकार याला चालु वाहनांवर चक्कर आली. खर्रा खाल्ल्यानं चक्कर आली असं सांगितलं आहे. चक्कर येताचं वाहनाचं संतुलन बिघडले आणि तिन्ही रस्त्यावर पडलेत यात मिनाक्षी रेचनकार महीलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी मनस्वी रेचनकार ही गंभीर जखमी झाली आहे.

 लवकेश रेचनकार व मुलगी मनस्वी रेचनकार ह्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी सिंदेवाही पोलीसांनी दाखल केलेत. परंतु मुलगी मनस्वी रेचनकार हिची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ १०८ ॲम्बुलन्सनी हलविण्यात आले. मुलीसोबत सिंदेवाही चे पोलिस निरीक्षक तुशार चव्हाण यांनी कर्तव्याची जबाबदारी स्वीकारत चंद्रपूर सोबत गेले आहेत.

लवलेश रेचनकार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने सिंदेवाही येथे उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक युनुसभाई शेख,माजी जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम, रुग्णसेवक सुभान पठाण, शिवसेना तालुकाप्रमुख राकेश अलोने यांची उपस्थिती होती.