सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी कांही देणे घेणे नाही.. शेतकरी पुत्र विनोद उमरे Rulers have nothing to do with farmers’ issues..Farmer’s son Vinod Umre

Share News

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 जून) :- राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात पण शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता नाही.कृषी प्रधान देशात चाले तरी काय लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांचे प्रश्न आणि विकासकामांशी कांही देणे घेणे राहीले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या नुसत्या घोषणा केल्या.

शेतकर्‍यांची सातत्याने फसवणूक करणार्‍यांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे .असे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी केले. मातोश्री पांदण रस्ता चे चिमूर तालुकयातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करा.मातोश्री पांदन रस्ते योजना आहे.तरी कोणासाठी शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात,नुसते बोलून चालत नाही.योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.शेतकरी पुत्र विनोद उमरे.चिमूर तालूक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे.

चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस ,धान उत्पादक शेतकरी बांधवाना शेतीची विविध कामे करण्यासाठी पांदन रस्ता वरुन आवागमन करावे लागत आहे. परंतु सदर बरेच रस्ते कच्चे असल्याने सोयाबीन, कापूस धान, उत्पादक शेतकरी बांधवाना शेतावर ये-जा करण्यासाठी शारिरीक, मानसिक भावनिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सकृतपने दिसून येत असून पावसाळ्यामध्ये तारांबळ उडत असते पांदन रस्ताच्या समस्येमुळे शेतीची कामे करण्यास विलंब होत असतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गाव निहाय पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करुन सोयाबीन, कापूस ,धान, शेतकरी यांना दिलासा होतील त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्ते खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे .

Share News

More From Author

प्रवेशित कु. पुजा मानसिंग डुमाला वय वय ०८ वर्षे १० महिने या बालिकेसाठी बाल कल्याण समिती, अमरावती यांचे आवाहन Entered Ms. Child Welfare Committee, Amravati Appeal for Puja Mansingh Dumala Age 08 Years 10 Months

अवध्या चार तासात अपहरण नवजात बालकाचा शोध घेण्याय यश  Awadhya succeeds in finding the abducted newborn child in four hours

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *