भद्रावती, चंदनखेडा,शेगाव,चिमूर मार्ग बंद  Bhadravati, Chandankheda, Shegaon, Chimur Marg closed

▫️मुसळधार पाण्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित(Life in rural areas disrupted by heavy water)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.18 जुलै) :- दुपारच्या दरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव, चिमूर मार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प पडलेली आहे.

पावसामुळे भद्रावती चंदनखेडा,शेगाव,चिमुर मुख्य मार्गावर असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून पारोधी या गावात ईरई नाल्याचे पाणी शिरले असून दुपारच्या सुमारास जनजीवन विस्कळीत झालेली आहे, तर वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरातील ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाणीशिरले असून जनावराच्या चाराचे नुकसान झालेले आहे..

त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची दखल घेण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.