एका वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे वेतन नाही   Gram panchayat employee has not been paid since one year

1390

🔸कर्मचाऱ्याचा कार्यालयासमोर ठिय्या.. जोपर्यंत वेतन मिळणार नाही ती पर्यंत बेमुदत संप(Stand in front of the office of the employee.. Indefinite strike until the salary is not paid)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 मे ) :-     

         स्थानिक.शेगाव येथून जवळच असलेल्या साखरा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार वेतन गेल्या १३ महिन्या पासून न मिळाल्याने येथील कर्मचारी आपल्या पगाराच्या मागणी करिता ग्राम पंचायत कार्यक्रया समोर गेल्या दोन दिवसापासून ठीया मांडून बसले असून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. 

     सविस्तर असे की येथील कर्मचारी प्रशांत घुगल ग्राम पंचायत शिपाई तसेच प्रभाकर बोलोरे पाणी पुरवठा कर्मचारी यांची गेल्या तेरा महिन्या पासून यांचा पगार वेतन न मिळाल्याने यांच्यावर तसेच त्यांच्या कुुंटूबियांवर उपासमारीची वेळ येत असल्याने त्यांनी अनेक दा येथील ग्रामसेवक तसेच सरपंच महोदय यांना आपल्या कष्टाचा मिळकतीचा हकाचा पगार मागितला असता अनेक वेळा यावर यांनी कर्मचाऱ्यांना उडवा उडविचे उत्तर देऊन हल्कविण्याचा प्रयत्न केला परंतु आज त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयावर संसार चालविणे कठीण झाल्याने तसेच उपास मारीची वेळ आल्याने त्यांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला आहे 

        गेले दोन दिवस लोटून देखील या कडे शासन तसेच प्रशासन यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या संपामुळे साखरा वासियांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना भर उन्हाळ्यात यांच्या संपामुळे पिण्याचे पाणी देखील वेळेवर मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले .

       करिता गोर गरीब ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या कुटुंबाचा विचार लक्षात घेऊन तसेच गावकऱ्यांच्या जीवनावश्यक समस्या लक्षात घेऊन यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करून यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी कर्मचारी तसेच गावकरी यांनी केली आहे .

    जो पर्यंत वेतन पगार मिळणार नाही तो पर्यंत आम्ही आमच्या मुला बाळा सह कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे आंदोलन करत्या कर्मचारी यांनी सांगितले …