बाजार समितीतील उमेदवारांना सहलीची ऑफर Trip Offer to Candidates in Market Committee

✒️ गोपाल निब्रड चंद्रपूर (Chandrapur विशेष प्रतिनिधी)

 चंद्रपूर (दि.26 एप्रिल) :- 28 तारखेला होऊ घातलेल्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची लढत काँग्रेस भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे तर एकनाथ शिंदे गटाचे समर्थित उमेदवार नितीन मते यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.

 उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण 47 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी 22 उमेदवार हे सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटातूननिवडणूक लढवित आहे.त्यामुळे याच गटात जास्त चोरस दिसून येत असल्याचे चित्र आहे तसेच सहकारी संस्था महिला व ग्रामपंचायत मतदार संघातही सुरत बघायला मिळत आहे.

 बाजार समितीच्या निवडणुकीत आणि उमेदवार मतदारांना सहलीची आफरी देत असल्या मुळे मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे अनेक मतदारसंघाचे आकर्षी वाट बघत आहे या सहलीवर अनेकांच्या विजयाचे गणितही अवलंबून आहे. पोरा बाजार समिती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची आघाडी तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी लढत होत आहे त्यामुळे येथील निवडणुकीत सुरज निर्माण झाली आहे सध्या ही बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे हा ताबा कायम ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे.

 या निवडणुकांमध्ये चंगळवाद फोफावताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मागील निवडणुकांचे अवलोकन केले असता याची प्रचिती येते. साम-दाम-दंड बाजूला करून मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखविल्या जात असतात. भोजनाच्या पंक्तींनी संध्याकाळी धाबे फुल झालेले दिसतात. अनेक मतदार एवढ्यावरच समाधान न मानता तीन-चार दिवस बाहेर कुठून फिरून येण्याची इच्छाही व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.