उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातील मुलांना शिक्षणाचे धडे Education lessons to village children during summer vacation

155

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.23 एप्रिल) :- 

             वरोरा तालुक्यातील उखर्डा येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत मंदिरात गावातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. लॉक डाऊन मध्ये सर्वांचीच शाळा बंद असताना इथे मंदिरात शाळा सुरू होती. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन अनेक स्पर्धा आयोजित केल्या. सुरळीत शाळा सुरू होती. 

आता पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मंदिरात शाळा सुरू करण्यात आली.  अभिजीत कुडे गावातील चिमुकल्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. इंग्लिश व्याकरण, मराठी, गणित सर्व प्रकाराचे वर्ग सुरू करण्यात आले. सायंकाळी 5:30 ते 7 हे वर्ग सुरू आहे. मोफत शिकवणीला मुलांचा जबरदस्त प्रतिसाद आहे. अंगणवाडी ते 8 पर्यंत असे 50,54 विद्यार्थी दररोज येत आहे.  

विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे. लॉक डाऊन मध्ये देखील अभिजित नि सर्व नियमांचे पालन करत गावातील मंदिरात शाळा सुरू केली होती. आता पुन्हा त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आपल्या वेळ गावातील मुलांना सत्कार्यासाठी जावा असे त्याला वाटतेच. मुलांची संख्या वाढली आहे त्यामुळे 2 बॅच करणार. 

मुलांमधे उत्साह आहे, शिक्षणाची आवड आहे त्यामुळे मला पण आनंद मिळतो..मुलांचे प्रेम मिळत .दिवसातून 1 तास मी गावातील मुलांना शिकविण्यास देत आहे याचे फार समाधान आहे. 4 दिवस झाले वर्ग सुरू आहे. हनुमान मंदिराच्या हॉल मध्ये चालू आहे…