🔹जिवीत हानी थोडक्यात वाचली
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.17 एप्रिल) :-
पाथरी जवळ असलेल्या कॅनल जवळील वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आढळून वाहनाने घेतली पेट या गाडीत तिघेजण असल्याने तिघेही सुखरूप बाहेर पडले.
ही घटना सोमवार रोजी साडेचार च्या सुमारास घडली असून राहुल रामचंद्र जुमनाके रा. संजय नगर चंद्रपूर व त्यांचे नातेवाईक गौरव कुसराम व सौरव कुसराम हे तिघेही चार चाकी वाहनाने असोला मेंढ्याला नातेवाईकांना सोडून दिले .
व असोला मेंढ्या येथून परत येत असताना पाथरी जवळ कॅनल जवळ असलेल्या वळण असलेल्या ठिकाणी वाहन चालक राहुल जुमनाके यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नंबर एम.एच. 34 बी. आर. 5724 रेनॉल्ट ड्रायव्हर ट्रायबेर ही कार झाडाला आदळली यातून तिघेही सुखरूप बाहेर निघाले .
परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेऊन गाडी पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना कळतात घटनास्थळ गाठून वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे
