श्रीराम जन्मोत्सव समीती शेगांव (बू) आयोजीत भव्य रामनवमी उत्सव व भव्य शोभायात्रा Grand ram navami festival and grand parade organised by Shri Ram janmotsav samiti Shegaon (bu)

406

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.28 मार्च) :-महादेव देवस्थान( राम मंदिर) शेगांव (बू) येथे चैत्र राम नवरात्र उत्सावा निमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर घेऊन करण्यात आली. तसेच श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे २९.०३.२०२३ ला सकाळी 10 वाजत बाईक रैली आणि ३०.०३. २०२३ रोज गुरुवारला भव्य शोभायात्रा महादेव देवस्थान(राम मंदिर) येथून निघणार आहे. 

या भव्यदिव्य शोभायाचे स्वरूप आकर्षक झाकी, देखावे, भजन मंडली, बाईक रैली,आर्केस्ट्रा,मेला शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे शेगांव (बू) शहरातील विविध समाजांच्या या भव्य शोभायात्रे मध्ये सहभाग असणार आहे. या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ महादेव देवस्थान (राम मंदीर) येथून निघुन संपुर्ण गावात ठिकठिकाणाहून जाणार आहेत.

महादेव देवस्थान (राम मंदिर) शेगांव (बू) येथे ही शोभायात्रा पोहचणार आहे. अशी रूपरेषा या शोभायात्रेची असणार आहे. तरी या भव्य शोभायात्रेचा सर्व शेगांव (बू) वासियांना तसेच सर्व बाहेरील जनतेनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.