कोरपण्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी Burglary at three places in one night in korpana 

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.19 एप्रिल) :- 

           एकाचं रात्री एक दुकान व दोन घरून चोरट्यांनी विविध वस्तू लंपास केल्याची घटना मध्यरात्री १२ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली.

पहिल्या घटनेत मेन रोड वरील डायमंड ज्वेलर्स येथील शटरचे लॉक कटर च्या सह्ययाने तोडून ज्वेलर्स मधील वेगवेगळे चांदीचे जोडवे, चाळ, पैजन, बीचवे आदी वस्तू अंदाजे किंमत ४६ हजार रुपये लंपास केले. याची तक्रार ज्वेलर्स मालक अब्दुल मोहम्मद यांनी दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत कोरपना येथील वामन मेश्राम यांच्या घरच्यां अंगणातून एम एच ३४ सी सी ५६४५ क्रमांकाची शाईन गाडी अंदाजे किंमत ८० हजार चोरट्यानी लंपास केली.

तिसऱ्या घटनेत कोरपना येथील पाण्याच्या टाकीजवळ वास्तव्य असलेले पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत कर्मचारी ज्ञानेश्वर भुसारी यांच्या घरची एम आय ची फ्लॅट एल ई डी टी वी अंदाजे किंमत १० हजार रुपये व रोख सतरा हजार रुपये ची रक्कम लंपास केली.

या सर्व घटना एकाच दिवशी बारा ते तीन या तीन तासा दरम्यान तीन चोरीच्या घटना घडल्याने कोरपनात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय शुक्ला, अमर राठोड व कोरपना पोलीस करीत आहे.

Share News

More From Author

भर उन्हात चिमुकल्या सह आदिवासीचे रास्ता रोको व ठिय्या आंदोलन Stop and stop the movement of tribals with children in full sun

महिलांना एसटी प्रवासात तिकीट मधे पन्नास टक्के दिलेली सूट रद्द करा Abolish the 50% discount given to women in St travel tickets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *