मानधनाची रक्कम अपंग व निराधारांना वाटप Distribution of stipend to the disabled and destitute

Share News

🔹चारगाव खुर्द ग्राम पंचायत सदस्याचा कौतुकास्पद उपक्रम

✒️आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.15 एप्रिल) :- 

        स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्याने विविध कार्यक्रम घेण्यात आले याचेच ओचीत्य साधून येथील ग्रामपंचायत चे सदस्य श्री सिद्धार्थ गायकवाड यांनी त्यांना मिळत असलेल्या शासकीय मानधनाचा योग्य वापर करून गेल्या अनेक महिन्या पासून त्यांना प्राप्त होत असलेले सर्व मानधन गावातील गोर गरीब गरजू अपंग व्यक्ती , विद्यार्थी यांना शैक्षणिक कामाकरीता पुरवितात .

आज देखील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने गावातील अपंग बांधवांना मिळालेली सर्व रक्कम भेट देऊन गावात एक आदर्श निर्माण केला गेला असल्याने त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमला गावात विशेष बाब मिळाली असून त्यांचे कौतुक केले जात आहे .

         विशेष म्हणजे त्यांच्या घरातील त्यांचे आजोबा डोमाजी गायकवाड , त्यांचे मोठे वडील कन्हैया डोमाजी गायकवाड हे देखील सरपंच पदाची धुरा सांभाळली असून जनसेवा केली होती . यावेळी माजी उपसरपंच श्री राजू गोडघाटे , सुधाकर वाघमारे , विजय गायकवाड , वसतिगृह अधीक्षक सुभाष एकरे,सचिन वाघमारे , दामोधर पावडे , व अन्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

More From Author

चंदनखेडा येथे आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली Ambedkar jayanti was celebrated at chandankheada

मुस्लिम बांधवतर्फे भीम जयंती निमित्याने सरबत व अल्पोहरचे आयोजन Organized sarbat and alpohar on the occasion of bhim jayanti by Muslim brothers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *