मुस्लिम बांधवतर्फे भीम जयंती निमित्याने सरबत व अल्पोहरचे आयोजन Organized sarbat and alpohar on the occasion of bhim jayanti by Muslim brothers

363

🔹मुस्लिम बांधवांनी दिला सर्वधर्म समभावतेचा संदेश

✒️आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.15 एप्रिल) :- 

                 स्थानिक शेगाव येथे विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली बौध्द मंडळ शेगाव बू च्या वतीने यावेळी विविध कार्यक्रम आयोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करून दीप प्रज्वलन करुन , माल्यार्पण करून गावात भव्य रॅली मिरवणूक काढण्यात आली.

तर यात गावातील तरुण तरुणी बौद्ध उपासक उपसिका , तसेच बालकांनी सहभाग घेऊन ढोल ताशांच्या गजरात व डिजे च्या तालावर तरुणाचे पाय थिरकत होते . तर फटाक्याच्या आतिश बाजीने शेगाव नगरी दुमदुमली होती.  

         मुख्य मार्गावर असलेले जामा मस्जिद चे सर्व पदाधिकारी सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या स्व खर्चातून भीम रॅलीत सहभागी होणाऱ्या संपूर्ण बांधवांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी ,सरबत , अल्पोहर , चे आयोजन करण्यात आले होते. तर याचा आनंद सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घेतला.

व भीम जयंतीचा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करून एक मेकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला. शिवाय या पूर्वी देखील राम नवमी महोत्सवाला देखील अशा प्रकारचे आयोजन केले होते. त्यामुळे शेगाव बू येथील मुस्लिम बांधव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दाखवून एकमेकांच्या सुख दुःखात आनंदोत्सवात सहभागी होतात.

त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांचे कार्य हे अधिक थोर मोलाचे असून सर्वधर्म समभाव एकतेचे प्रतीक असल्याचे सिद्ध होते. यावेळी जामा मस्जिद शेगाव बू चे अध्यक्ष श्री बशीर कुरेशी , डॉ. इस्माईल पठाण , सोहेल शेख , फारुख शेख , मिनाज गणी, आवेश गणी, इस्माईल , आवेश , मुस्ताक भाई , अयाज, अयान, तनशिप, ताहशिन, सादिक शेख , आदिब, मोनु,फैजल, अली, नुमान , इत्यादी मुस्लिम बांधवांनी मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला….