भीम जयंतीचे औचित्य साधून  शेगाव ग्रामपंचायत अंतर्गत भांडे व अन्य साहित्याचे वाटप On the occasion of bhim jayanti distribution of pots and other materials under Shegaon gram panchayat 

375

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.15 एप्रिल) :- 

स्थानिक शेगाव बू येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यावेळी येथील सरपंच श्री सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते बाबा साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून पूजन करून केक कापून भीम जयंती साजरी करण्यात आली.. तसेच सर्व पदाधिकारी तसेच कर्मचारी यांनी देखील आदरांजली वाहिली.. 

     याचेच ओचीत्या साधून ग्रामपंचायत निधी अंतर्गत मागासवर्गीय विविध मंडळांना अन्न शिजविण्या करिता जरमन चे भांडे वितरण करण्यात आले . तसेच गावात असलेल्या अंगणवाडी येथे महिला बाल कल्याण निधी अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अंगणवाडीत अन्न धान्य साठविण्यासाठी लोखंडी पिंप (कोटी ) चे वितरण करण्यात आले.

यावेळी सरपंच श्री सिद्धार्थ पाटील, शंकर घोडमारे, यशवंत लोडे , जोत्सना फुलकर, माया तडस , माया आत्राम ,मंजुषा घोडमारे, रेखाताई दडमल, निखारे ताई , पटेल ताई ,ग्राम विकास अधिकारी श्री गेडाम साहेब , तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री अनंता कोटकर , नंदू चौधरी , इत्यादी कर्मचारी तसेच गावातील नागरिक अंगणवाडी सेविका , मोठ्या संख्येने उपस्थित होते.