✒️योगेश मेश्राम चिमूर(मालेवाडा प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.2 एप्रिल) :- चंद्रपूर जिल्ह्यातील रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथांसाठी एकमेव दिव्यवंदना आधार फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे. चिमुर तालुक्यातील जामगाव (भिसी) येथील देवदुत शुभम पसारकर यांनी दिव्यवंदना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक बेघर,बेवारस,भिक्षेकरी ,निराधार,लोकांना आधार दिला आहे.
फक्त आधारच नाही तर दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा लोकांच्या सेवेकरीता रुग्णवाईका उपलब्ध करून दिली आहे .शुभम पसारकर यांनी अनेक बेघर ,बेवारस लोकांना समाजाच्या प्रवाहात आणणे व उद्योग उपलब्ध करून दिली आहे.त्यांनी चिमुर तालुक्यातील जामगाव येथे भव्य दिव्यवंदना आधार निवारागृह निर्माणकाम सुरू आहे.त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील चार दिवशीय शोध मोहीम सुरू केली आहे .
यामध्ये रोडवरील बेघर,बेवारस,निराधार,भिक्षेकरी अनाथ,यांना शोधत काल ब्रम्हपुरी येथे मनोरुग्ण लाभार्थी गजानन चुऱ्हे वय ४५ असुन याची पहानी केली व त्याची आंघोळ करून मेंकओअर करणयात आले व त्यास समाजात जाग़णयाचा आधीकार दीला .
त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान बघून पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळत असते असे मत दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी व्यक्त केले. यावेळी फाऊंडेशन च्या सदस्य दिव्या गलगले,विलास गलग़ले,रोहन मडावि व शहरातील काही नागरिक उपस्थित होते.
