डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करावी डी जे वर नाचून काय मिळणार Dr. babasaheb ambedkar jayanti should be celebrated not by dancing but by reading what will be gained by dancing on dj

358

✒️योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा प्रतिनिधी)

मालेवाडा(दि.21 मार्च) :- चिमूर तालुक्यात बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. ही जयंती डी जे वर न नाचता वाचून साजरी करावी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी करण्यात येणार आहे.

सामाजिक, आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहावी. भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो.