वरोरा येथे सांस्कृतिक सभागृह निर्माण करा….किशोर टोंगे

🔸पालकमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांना आवाहन 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.6 जानेवारी) :-

         वरोरा येथील एकर्जूना येथे ग्रामस्थांच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीचे भाकर हे नाटक आयोजित करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी किशोर टोंगे यांनी आपल्या उदघाट्नपर भाषणात जिल्ह्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री असताना वरोरा शहरात भव्य सांस्कृतिक रंग मंदिर व्हावे असे आवाहन किशोर टोंगे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना केले.

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा हे सांस्कृतिक आणि सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे केंद्र असूनही शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातं असतात मात्र शहरात कुठलेही सभागृह नाही याविषयी खेद वाटतो.

जिल्ह्यात यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री होऊन गेले तरीसुद्धा सांस्कृतिक सभागृह होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे. 

आपल्या भाषणांमधून सांगितले की कोणतीही काम करण्याची शैली, जिद्द,चिकाटी,असले की ते काम करण्यास कोणतीही अडचण निर्माण होत नाही असे सांगितले. मी यापूर्वी देखील त्यांना हा विषय निवेदनाद्वारे पोहचवला आहॆ. मात्र अजूनही याबाबतीत काहीही झालेले दिसत नाही त्यामुळे आतातरी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन वरोरा शहर व परिसरातील लोकांना दर्ज्रेदार रंगमंदिर उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली.

यावेळी व्यासपीठावर रमेश राजुरकर, राजु गायकवाड माजी सभापती, एकर्जुना चे सरपंच व आयोजक देविदास ताजने इत्यादी उपस्थित होते.