पोलीस पाटील भरती प्रकियेत अनियमितता होत असून चौकशी करण्यात यावी – जयंत टेमुर्डे  Police Patil recruitment process is irregular and should be investigated – Jayant Temurde

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17 जुलै) :- वरोरा उपविभागिय अधिकारी यांचे कडून दिनांक 9जुलै 2023 रोजी पोलीस पाटील भरती बाबत परीक्षा घेण्यात आली परंतु या भरती प्रकियेत अर्ज स्वीकारण्यात आलेले असतांना नियमा प्रमाणे कागदपत्राची तपासणी करुन नंतर परिक्षा आवश्यक असतांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता परिक्षा घेण्यात आली.

त्यामुळे खालील बाबी प्रशाशनाकडुन तपासण्यात आले नसल्याने परीक्षेचा घोळ झाल्याचे दिसून येते. पोलीस पाटील भरती प्रक्रियेचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात आले असून यात राखीव जागेवर आराखिव व इतरही लोकांनी अर्ज भरलेले होते ते मंजुर का करण्यात आले 

व या भरती प्रकियेत अर्ज स्वीकारुन सर्वांना एकत्रच परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली परंतु कोणतेही डाकुमेंट तपासणी न करता सरसकट अर्जदाराला परीक्षेत कसे बसवण्यात आले हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 परिक्षा घेतल्यानंतर विध्यार्थांचे गुण नोटीस बोर्डवर दुस-या दिवशी लावणे क्रमप्राप्त होते परंतु रात्री 9.30 वाजता निकाल का जाहीर करण्यात आला यात संभ्रम निर्माण होत आहे. परिक्षा झाल्यानंतर कागदपत्र तपासणी करणे हे कोणत्याही नियमात बसत नसून पोलीस पाटील परिक्षेत बसणा-या उमेदवारांचे गुण नोटीस बोर्डवर का लावण्यात आले नाही.विदयार्थ्याचे गुण न दर्शविता त्यांचे रोल नंबर टाकुन पास झालेल्यांची यादी प्रकाशीत केली परंतु कुणाला किती गुण प्राप्त झाले हे समजु शकले नसल्याने विदयार्थी संभ्रमात आहे.

  80 गुणाचा पेपर मध्ये मार्कचा तपशील न दिल्याने आपण पास किंवा नापास कसे दर्शवीनार व तोंडी परीक्षा कशी घेणार या बाबतीत शंका निर्माण होत असून हि परिक्षा अधिकारी आपले मर्जीनुसार घेत असल्याचे दिसुन येत आहे.

सदर बाबींचा विचार करता अधिकरी यावर उत्तर देण्यास नकार देत असून विदयाध्यांचे गूण दर्शविणारा फलक नोटीस बोर्डवर लावणे आवश्यक असून कागदपत्रे हि परीक्षेच्या आदी तपासणी करणे अत्यंत आवश्यक असतांना अधिकारी दुर्लक्ष करुन भरतीप्रकियेत घोळ निर्माण केलेला आहे. असे दिसुन येत असून हि प्रकिया रद्द करण्यात येवून चौकशी करण्यात यावी अशी मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभपतिपदी व राष्ट्रवादी चे विधानसभा प्रमुख जयंत टेमुर्डे यांनी एसडीएम यांना लेखी कळविले आहे.