मनरेगा अंतर्गत वयक्तिक लाभ व सार्वजनिक कामाचे मस्टर तात्काळ काढा  Personal benefits under mnrega and public work muster immediately

🔹अन्यथा सरपंच संघटनेचा अमरण उपोषणाचा इशारा

Otherwise the sarpanch organization’s singal of death support

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.2 मार्च) :-जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यवतमाळ. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ सरपंच संघटना महागाव यांच्यावतीने पंचायत समिती महागाव येथील गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांचे मास्टर (देयके) काढण्याकरिता बहिष्कार टाकला असून अनेक रोज मजुरांचे देयके थांबले आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांना अनेक आर्थिक अडचणींच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे

तसेच ग्रामपंचायत अंतर्गत नवीन उद्दिष्ट गुरांचे गोठे शेड सिंचन विहीर पूर्ण करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत गट विकास अधिकारी मार्फत त्यांनी केलेला बहिष्कार जर आपण येणाऱ्या काही दिवसात सोडविला नाही तर महागाव तालुक्यातील 76 ग्रामपंचायत सरपंच संघटना ही 8/3/2023 पासून आमरण उपोषणाला सुरुवात करेल

यावेळी सरपंच संघटना अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे विकास जाधव सरपंच श्रीधर भवांकर वैभव बर्डे दिगंबर राजने गजानन बुडाळ संतोष कोरके दिनेश रावते इत्यादी सरपंच उपस्थित होते.