विद्यार्थ्यांनो उत्तुंग झेप घेत आकाश कवेत घ्या- रवींद्र तिराणिक

160

🔹अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम 

🔸आनंदवनातील विद्यार्थ्यासाठी 

🔹शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक परीक्षा विषयक साहित्य भेट

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा (दि.28 जानेवारी) :- विद्यार्थ्यांनो प्रगतीच्या दिशेने उत्तुंग झेप घेत आकाश कवेत घेण्याचा प्रयत्न करा यश तुमचेच आहे. असा संवाद अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख व जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी विद्यार्थ्यांशी केला . 

जगप्रसिद्ध समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवन येथील (आनंद माध्यमिक विद्यालय) येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा वरोरा द्वारा संकल्पनेतून साकारलेला(भेट शाळेची शैक्षणिक धोरणाची )उपक्रम हाती घेतलेल्या कार्यक्रमात परीक्षा विषयक (पॅड पेन रजिस्टर) साहित्य वितरण आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 

आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन शाळा स्थापनाची मुहूर्त मेढ २०१८ ला समाजसेवक, महारोगी सेवा समितीचे सचिव आदरणीय डॉ. विकास आमटे यांच्या स्वकल्पनेतून व प्रेरणेतून प्रथमताः रोवल्या गेली. या शाळेत सुरुवातीला १३ विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन सुरू झालेे

 त्यानंतर शाळेतील तज्ञ विषयांन्वये शिक्षकांचे शिकवण्याचे कौशल्य यामुळे विद्यार्थ्यांच्या द्मानात भर पडली .आणि शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली .तसेच गोरगरीब, मजूरदार ,कष्टकऱ्यांची मुले घरापासून दूरच्या शाळेत जाऊ शकत नव्हती. यासाठी त्यांना जवळच्या शाळेचा मुलांना आधार मिळाला आहे. आणि शाळा सुरू झाल्यापासून २०१८ते २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत आज ११५विद्यार्थी संख्या झाली आहे.

अशी सविस्तर प्रगती पर माहिती माहिती सूत्रसंचालन व प्रास्ताविक मनोगतातून प्रदीप कोहपरे पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंद माध्यमिक शाळा आनंदवन येथील ११५ विद्यार्थ्यांचा प्रगतीचा गुणगौरव करीत परीक्षा विषयक (पॅड पेन रजिस्टर) वरोरा येथील पत्रकार संघाच्या वतीने भेट देण्यात आले. 

शशिकांत मोकाशे, परमानंद तिराणीक यांनी विद्यार्थ्यांच्या कला संवर्धन सर्वांगीण विकासात्मक शैक्षणिक धोरण व उद्यनमुख असे मौलिक विचार उपस्थित मान्यवरांनी मांडले.

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख व जनमंचचे सदस्य रवींद्र तिरानिक, आनंद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे ,अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे (वरोरा -पत्रकार) संघाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सादिक थैम, जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे, सामाजिक मंच सचिव परमानंद तिरानिक  वरोरा संघटक ज्ञानिवंत गेडाम ,

सहसचिव मनोज गाठले, कोषाध्यक्ष जगदीश पेंदाम, लखन केशवानी, धर्मेंद्र सेरकूरे, पर्यावरण संवर्धन प्रमुख श्रीपाद बाकरे, प्रशांत बदकी ,नरेश साळवे ,तुलशी आलम उपस्थित होते. आनंद माध्यमिक शाळेच्या उत्तरोउत्तर प्रगती साठी सदैव तत्परत असणारे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे, सहा. शिक्षक प्रदीप कोहपरे, आशिष येटे, मयूर गोवारदिपे , शिक्षिका स्मिता काळे, निशा येरणे व लिपिक प्रकाश नाकाडे आदींच्या कार्याची प्रसंगी कार्यक्रमात प्रशंसा करण्यात आली.