शिवसेना युवासेना चंद्रपूर तर्फे मिस इंडिया डिवाइनचा सत्कार

504

✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.6 जानेवारी) :- शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,शिवसेना उपनेत्या सौं सुषमा अंधारे चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असताना कार्यकर्त्यांशी व काही सामाजिक संघटनेशी सवांद साधला त्यावेळी शिवसेना युवासेना तर्फे तसेच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये मिस इंडिया डिवाइन 2022 विजेता कुमारी भाग्यश्री तामगाडगे यांचा चंद्रपूर येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.

त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदु पढाल, भोजराज ग्यानबोनवार,श्रीहरी सातपुते, लीलाधर चौधरी , माजी जिल्हा परिषद सदस्य दादा दहिकर,युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव,जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे,भाऊराव डांगे, अतुल नांदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश जिवतोडे, तालुकाप्रमुख राहुल मालेकर, उपशहर संघटिका अल्का पचारे,वंदना डाखरे, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक युवासैनिक,उपस्थित होते.