कान्सा (सि.) येथील मोफत आरोग्य शिबीरात ४९७ रुग्णांनी घेतला लाभ

🔸रविंद्र शिंदे यांच्या हस्ते वंदनिय तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.29 डिसेंबर) :- तालुक्यातील कान्सा (सि.) येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत २६ डिसेंबर रोजी श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.२९) ला गावातील ग्रा.पं. पटांगणावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, श्री. गुरुदेव सेवा मंडळ कान्सा (सि.) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. तसेच ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते वंदनिय तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन संपन्न झाले.

कान्सा येथील श्री हनुमान मंदीर येथील श्री हनुमान प्रभुस नमन करुन श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंर्तगत वंदनीय तुकडोजी महाराज, श्रध्देय बाबा आमटे तसेच ईतर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन शिबीराचे रितसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख तसेच ट्रस्टचे विश्वस्त रविंद्र शिंदे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सामाजिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरीक गणेशराव घोडमारे, भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती तसेच उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, सरपंच मयुर टोंगे, पोलीस पाटील दिपक कुंभारे, माजी नगरसेवक तथा भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल, विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष तसेच युवासेना जिल्हा अधिकारी रोहन कुटेमाटे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विकास मत्ते, हरीभाऊ रोडे, प्रतिष्ठीत नागरीक नामदेव टोंगे, डॉ. नंदकिशोर रोडे, तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते निखील मत्ते, पुरुषोत्तम चौधरी, शंकर रोडे, प्रफुल आसुटकर व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नंदोरी ग्रा.प.चे सरपंच मंगेश भोयर यांनी केले.

ट्रस्टचे उपक्रम विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम योजनेअंतर्गत वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा भेट देण्यात आला असुन मुर्ती प्राणप्रतिष्ठा जागेचे भुमीपुजन रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

आरोग्य शिबीरात सर्व रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधी वितरीत करण्यात आली. आरोग्य शिबीरास शिबीर प्रमुख डॉ. शशांक गोतरकर, अस्थीरोग तज्ञ डॉ. विवेक जडावाला, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्वेता अलोणे व डॉक्टर चमु तसेच रुग्णालयाचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर उमाटे, सचिन आगलावे, अभिषेक टिकले यांनी अति मोलाची सेवा प्रदान केली. आरोग्य शिबीरामध्ये एकुण ४९७ नागरीकांनी नोंदणी करुन लाभ घेतला. या शिबीराचा आजूबाजुच्या गावातील जनतेनी लाभ घेत उस्फुर्त सहभाग नोंदवीला. प्रामुख्याने संत लहरीबाबा अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ११४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिबीराचा लाभ मिळाल्याबद्दल उपस्थित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक महेश काकडे, अधिक्षक पायल जिवतोडे तसेच शिक्षक धिरज मजगवळी यांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले.  

आरोग्य शिबीरात एकुण नोंद रुग्णापैकी दुर्धर आजार असलेल्या एकुण ४९ रुग्णांना पुढील उपचाराकरीता आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी, वर्धा येथे ट्रस्टमार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती रविंद्र शिंदे यांनी दिली. सावंगी रुग्णालयात पुढील उपचाराकरीता येणारा खर्च हा ट्रस्टकडे तसेच हॉस्पीटलमध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहणार, असे ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी यावेळी सांगीतले.

ट्रस्टद्वारे ग्रामीण व शहरी भागात श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान सुरु आहे. दिव्यांगाना सायकल वाटप, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतकार्य, कोरोनाने मृत, आत्महत्याग्रस्त, निराधार, गरीब गरजू पालकांच्या पाल्यांचा मोफत विवाह सोहळा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकरी-शेतमजूर, पाळीव प्राणी यांना मदतकार्य, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, क्रीडा स्पर्धा, लघु व्यावसायिकांना मदत, आत्महत्येच्या मार्गावर असलेल्यांना धीर देण्याचे कार्य, सामाजिक जागृती हेतूने विविध बौध्दिक मार्गदर्शनपर उपक्रम, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, आदी विविधांगी कार्य सुरू आहेत

आरोग्य शिबीरास मोलाचे सहकार्य लाभलेल्या डॉक्टर चमुचे शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भद्रावती कृ.उ.बा. समिती संचालक गजानन पाटील उताने, कान्सा ग्रा.प. सदस्या सोनु रोडे, सुभद्रा गेडाम, रुपा मुंभारे, ग्रा.प. सदस्य संजय किन्हाके, संदीप टोंग तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते चंद्रशेखर घुगुल, गणेश रोडे, सुनील रोडे, देवराव पिदुरकर, रामराव मडावी, गणेश शेंडे, कवडू मडावी, शारदा आसुटकर, गिता मत्ते, मंदा पिदुरकर, कुसुम रोड व गावातील प्रतिष्ठीत नागरीक, गावकरी उपस्थिती होते. 

कार्यक्रम योग्यरित्या पाड पाडण्याकरीता ट्रस्टचे कार्यवाहक तथा अन्नदाता एकता मंच संस्थापक अनुप कुटेमाटे, युवराज इंगळे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अनिल मत्ते, सुभदा गेडाम, ललीत पिदुरकर, भास्कर मत्ते, अनिता मत्ते, सुधाकर किन्हाके, भास्कर कुटेमाटे, पुषहास मत्ते, धानोली येथील बालाजी रोडे, राजु रोडे तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यानी मोलाचे सहकार्य केले. ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तसेच संस्थापक तसेच विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.