कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांची पुन्हा मनसे प्रमुख राज ठाकरे कडे धाव

🔸न्याय मिळवून देण्याची हमी दिल्यानंतर सुद्धा न्याय न मिळाल्याने नागपूरच्या दौऱ्याच्या वेळी करणार पुन्हा ठिय्या आंदोलन

✒️चंद्रपूर(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16डिसेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 10 हजार गुंतवणूकदारांची कलकाम कंपनीच्या संचालकांनी जवळपास 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक केली असल्याने कलकाम च्या गुंतवणूकदारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्याच्या वेळी एन डी हॉटेल समोर ठिय्या आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधले होते व ही बातमी संपूर्ण टीव्ही न्यूज चैनेल च्या प्रतिनिधीनी लाइव दाखवली होती.

त्या दरम्यान त्यांनी हा विषय पक्षाचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे देऊन या कलकाम च्या गुंतवणूकदारांना 15 दिवसात न्याय मिळवून देण्याचा आदेश दिला होता परंतु आता त्या घतनेला दोन महिने उलटून गेले असताना सुद्धा कलकाम गुंतवणूकदारांची साधी भेट सुद्धा अविनाश जाधव यांनी घेतली नाही उलट ज्या प्रतिमा ठाकूर यांच्या विरोधात कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे तक्रार दिली त्या प्रतिमा ठाकूर यांनाचं पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष पद देऊन सन्मान केल्याने कलकाम गुंतवणूकदारांना आता न्याय मिळणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाल्याने कलकाम च्या गुंतवणूकदारांनी आता परत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची येणाऱ्या 23 डिसेंबरला भेट घेण्यासाठी निवेदन दिले आहे व या वेळी जर भेट झाली नाही तर राज ठाकरे यांच्या आगमन स्थळी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

ज्या गोरगरिब गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाचे व मेहनतीचे पैसे कलकाम कंपनीत गुंतवले व आता ते पैसे परत मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकरणाची तकार चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे दिल्यानंतर तिथे एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला पण मुख्य आरोपी विष्णू दळवी यांना सहा महिने लोटून सुद्धा अटक करण्यात आली नाही, मात्र त्याच कंपनीच्या संचालकांना मनसेचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर साथ देऊन कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्रात दिनदुबळ्या, शोषित पिडीत व अन्यायाग्रस्त यांना न्याय मिळवून देतात ही त्यांची ख्याती असल्याने कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या आशेने स्थानिक मनसे पदाधिकारी दिलीप रामेडवार, सचिन भोयर, राहुल बालमवार, सुनीता गायकवाड, राजू कुकडे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी संपर्क अध्यक्ष नंदू घाडीगावकर, महिला राज्य उपाध्यक्ष रिटा गुप्ता, अविनाश जाधव, संजय जाधव यांना मुंबई ला भेट दिली आणि राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा मुंबईच्या कार्यालयापासून तर चंद्रपूर दौऱ्यात भेटण्यासाठी ते गेले. दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून न्याय मिळेल या अपेक्षेत गुंतवणूकदार असल्याने त्यांनी चंद्रपूर च्या एंन डी हॉटेल मध्ये भेटण्यासाठी राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना भेट घालून देण्याची विनंती केली होती पण त्यांनी मदत केली नाही त्यामुळे गुंतवणूकदारांना हॉटेल बाहेर ठिय्या आंदोलन करावे लागले तेंव्हा कुठे राज ठाकरे यांची भेट झाली.

त्या भेटी दरम्यान 15 दिवसात न्याय मिळेल असे आश्वासन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी समोर राज ठाकरे यांनी देऊन हे l प्रकरण अविनाश जाधव यांच्याकडे दिले, परंतु अविनाश जाधव यांनी न्याय तर दिला नाहीच उलट कलकाम कंपणीच्या गुंतवणूकदारांना धमकावणाऱ्या व कलकाम कंपनीच्या संचालकांना मदत करणाऱ्या चंद्रपूरच्या पदाधिकारी प्रतिमा ठाकूर यांना राज ठाकरे यांच्या कडे चुकीची शिफारस करून चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष पद दिले तर मग आम्ही याचा अर्थ काय धरायचा? काय कलकाम कंपनीच्या संचालक विष्णू दळवी यांच्यासोबत आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी साठगांठ केली असे समजावे का ? असा सवाल गुंतवणूकदारांनी निवेदनातून केला आहे.

कलकाम च्या गुंतवणूकदारांनी निवेदनात समोर म्हटले आहे की जेंव्हा आपण हे प्रकरण अविनाश जाधव यांच्याकडे सोपवले होते तेंव्हा अविनाश जाधव यांना आम्ही म्हटले होते की “दादा आपणाकडे आम्ही या अगोदर सुद्धा आलो होतो पण आपण आम्हाला न्याय दिला नाही” तर त्यावर ते म्हणाले होते की ” आता माझ्या बापाने माझ्याकडे काम दिले ते मला करावेच लागेल ” पण दोन महिण्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला पण अविनाश जाधव यांनी साधा आम्हचा हजार वेळा फोन करून सुद्धा फोन उचलला नाही आणि ज्या प्रतिमा ठाकूर यांच्या विरोधात आम्हची तक्रार होती त्याच प्रतिमा ठाकूर यांना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व अविनाश जाधव यांनी आपल्याकडे चुकीची माहिती देऊन महिला जिल्हाध्यक्ष बनवले आणि आम्हाला न्यायापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले आहे. त्यामुळेच आम्हचा आपल्या पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावरचा विश्वास उडाला असून आपल्याला शेवटची भेट देऊन आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची आहे असे आवाहन सुद्धा निवेदनात केले आहे

निवेदनात पुढे म्हटल्या गेले की महाराष्ट्रातील न्याय देणारे शिवतीर्थ जर अन्याय करणाऱ्या प्रतिमा ठाकूर सारख्या व्यक्तींना महत्वाचे पद देऊन सन्मान करत असेल तर मग महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार व न्याय मागण्यासाठी सर्वासामान्य जनता कुठे जाणार ? हा प्रश्न उपास्थित होत आहे, त्यामुळे एकदा आम्हाला भेट देऊन आपली बाजू मांडण्याची संधी नागपूर च्या 23 डिसेंबर च्या दौऱ्याच्या वेळी द्यावी अन्यथा आम्ही नागपूरला आपल्या आगमन स्थळावर ठिय्या आंदोलन करू व तिथे सुद्धा भेट देण्यात आली नाही तर मुंबई च्या आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी आमचे सगळे मुलं बाळ यांच्यासह जवळपास 5 हजार लोक न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला व उगाच फालतू चिंता करून व आत्महत्या करून मरण्यापेक्षा संघर्ष करून मरू, जेणेकरून आम्हा गोरगरिबांचे 100 कोटी पेक्षा जास्त पैसे कलकाम चे संचालक विष्णू दळवी व त्यांना साथ देणाऱ्या तुमच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आम्हास मिळवून दिले नाही त्याविरोधात आम्ही न्याय मिळवताना शहीद होऊ व पुढच्या पिढीसाठी एक अन्यायाविरोधात लढण्याचा आदर्श निर्माण करू असा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

या निवेदनाच्या प्रती देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री तथा गॄहमंत्री महाराष्ट्र राज्य),सुधीरभाऊ मुनगंटीवार (पालकमंत्री चंद्रपूर), विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नागपूर विभाग नागपूर व पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना देण्यात आल्या. यावेळी कलकाम कलकाम कंपनीचे असंख्य गुंतवणूकदार उपस्थित होते.

सकारात्मक बदल!