मुद्दे मालासह लाखो रुपयांची देशी दारू जप्त

🔹शेगाव पोलिसांची कारवाई

✒️ शेगांव (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव(दि १५ डिसेंबर) :-  वरोरा तालुक्यातील शेगाव बू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या काटवल तुकुम येथे गेल्या अनेक वर्षांपासून ऐवध्य रित्या देशी दारूची सर्रास विक्री करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना मिळताच त्यांनी आपल्या पथकासह विशेष सापळा रचून ऐेव्यद्य दारू साठा जप्त करण्यात यश मिळाले ..

सविस्तर असे की गेल्या अनेक वर्षापासून काटवल येथील प्रणय राऊत हा सर्रास पने देशी दारूची विक्री करीत असून परिसरात ठोक रित्या दारू पोहचता करण्याचे काम पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून काम करीत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली त्याआधारे विशेष सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले यात आरोपी अंकुश राजू नंदेश्वर वय ३० वर्ष , प्रशिक मदन भैसारे वय २२ वर्ष , या दोघांना ताब्यात घेऊन अप क्र. ३१९/२०२२कलम ६५(अ ),८३ म. दा.का.प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक केले तर मुख्य आरोपी प्रणय रमेश राऊत वय ३० वर्ष राह.काटवल हा मात्र पडून गेला . तिसरा आरोपी प्रणय हा पडून गेला असला तरी त्याला तात्काळ पकडण्यात येईल असेही सांगण्यात आले . तर या आरोपी कडून ४० खर्ड्याचे खोके त्यात एकूण ४००० नग प्रत्येकी ९०ml. नी भरलेल्या रॉकेट संत्रा देशी दारू अंदाजे किंमत १,४००००रुपयाची देशी दारू जप्त केली तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन हुंडाई संट्रो mh -३४-k ५५८८ अंदाजे किंमत २००००० रू. असा एकूण मुद्देमालासह ३,४००००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर ही कारवाई स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन खाली श्री किशोर पिरके psi , श्री महादेव सरोदे psi , भीमराव पडोळे , रमेश पाटील , देवा डुकरे , विठल वैद्य , यांच्या सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली….