✒️ चिमूर (Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.20 डिसेंबर) :- तालुक्यात शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून अनेक गावांत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. अनेक ठिकाणी नव्याने पाइपलाइन टाकण्यात आली. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असून, कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.तालुक्यात अंदाजपत्रकानुसार कोणत्याही विहिरीचे बांधकाम होताना दिसत नाही. जलजीवन मिशन योजनेच्या विकासकामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विनोद उमरे यांनी केला आहे.
विहिरीच्या रिंगा तयार मिक्सर मशीनने सिमेंट काँक्रिट तयार करणे बंधनकारक असताना मजुरांकरवी ते तयार करण्यात येत आहेत. पाइपलाइन जमिनीत तीन फूट खोल टाकणे गरजेचे असताना ती अनेक ठिकाणी दोन फुटावरच टाकण्यात आली आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या विहिरी बुजवताना बोल्डर गिट्टी टाकणे आवश्यक असताना त्या ठिकाणी मातीने खड्डे बुजविण्यात येत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्यांचेही दुर्लक्ष होत आहे. टक्केवारी घेऊन निकृष्ठ कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विनोद उमरे यांनी केला आहे.
चर्च. असाच काही प्रकार चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर)गावात भष्टाचार झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करून निकृष्ठ कामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.






