🔸ग्राम पंचायत चारगाव खुर्द च प्रकार
🔹कार्यवाही ची मागणी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बूज(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.16 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द ग्राम पंचायत चे पितळ उघडे पडत असून गेल्या काही वर्षा पासून येथील सदस्य श्री सिद्धार्थ गायकवाड यांनी जुना शौचालय दाखवून काही वर्षा पूर्वी रमाई घरकुल तसेच शौचालय बांधकाम चा निधी १२ हजार रुपये निधी परस्पर उचलून हळप केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे तेव्हा संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे…
सविस्तर असे की ग्राम पंचायत चारगाव खुर्द ग्राम पंचायत कार्यालयात ९ सभासद असून सर्वस्वी व्यवहार सर्व सभासद यांच्या समोरासमोर केला जातो परंतु काही व्यवहार हे काही सभासद यांना न पटणारा असतो . त्यामुळे येथे असलेले संपूर्ण प्रकार जनतेसमोर येत आहे . तेव्हा आज देखील येथील येथील ग्राम पंचायत सदस्य देखील यांनी शौचालय न बांधता परस्पर जुना शौचालय दाखवून अनुदानाची रक्कम उचलली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा येथील ग्राम पंचायत सदस्य श्री सिद्धार्थ गायकवाड यांनी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.






