चारगाव शेगाव परिसरामध्ये प्रहार पक्षाचे पारडे जड

🔸अतेशामअली यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जोरदार प्रचार

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.15 नोव्हेंबर) :- ७५ वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तर आमदारकी या पदाकरिता अनेक उमेदवार आपल्या स्वबळावर डोळ्यात तेल टाकून नवरात्र झटपट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे .

तेव्हा ७५ वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार उभे असून अनेक उमेदवार राजकीय पक्षसह उभे आहेत तर काही अनेक उमेदवार अपक्ष देखील उमेदवार उभे आहेत. ज्या दिवसापासून उमेदवारांना उमेदवारी मिळाली तेव्हापासून सर्वच उमेदवार अथक कष्ट घेत मीच आमदार होणार हे स्वप्न पाहत आहेत परंतु गाव खेड्यातील शेगाव चारगाव बूज. साखरा, लोडीखेडा, वडगाव , व अन्य गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांच्या काही समस्या आहेत काय ? याची कुणी जाणीव च करताना दिसत नाही . परंतु आजही खेडे विभागातील ग्रामीण भागातील शेतमजूर हा अनेक सुख सोई पासून कोसोदुर आहे .

करिता याची जाणीव म्हणून प्रहार पक्षाचे उमेदवार श्री अतेश्याम अली हे चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या तसेच शेतमजुरांच्या समस्या जाणून घेतल्या . व त्या मी पूर्ण करणार असल्याची ग्वाही शेतमजुरांना दिली. हे राजकारण राज करण्यासाठी नव्हेतर जनतेची सेवा करण्यासाठी आहे. तेव्हा जातीच राजकारण न करता फक्त नि फक्त माणसाचे राजकारण करा.. जनतेनी योग्य उमेदवार पाहूनच योग्य उमेदवार निवडला पाहिजे . जेणे करून जनतेचा विकास होईल. अश्याच आशेने शेगाव बू, चारगाव बूज, परिसरातील जनता आता प्रहार पक्षाचे उमेदवार यांच्याकडे अधिक बोट दाखवत आहे.. विशेष म्हणजे अतेहश्याम अली हे वरोरा चे नगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले यात येथील नागरिकांना अनेक सुख सोई देखील प्राप्त करून दिल्यात त्यामुळे नव युवक मतदार मध्ये अली विषयी आपुलकी असल्याची दिसत आहे .

तेव्हा आतेश्याम अली देखील येथील नागरिकांचा विश्वास गमावणार नाही अशी खात्री देखील काही युवकांनी दिली आहे. तेव्हा चारगाव शेगाव परिसरामध्ये प्रहार पक्षाचे पारडे दिवसेंदिवस जड होत असून येत्या निवडणुकीमध्ये उंच भरारी देखील घेऊ शकतात असे दिसून येत आहे.