🔹आरोपी शिक्षकाला अकोला येथून अटक
✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2 ऑक्टोबर) :- गेल्या अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार , विद्यार्थीनी वर अत्याचार , मतिमंद मुलीवर अत्याचार अशे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार थांबण्यास कमी होत नसल्याचे महा भयानक दृश्य चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा काल उघडकीस आले आहे तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील मुली सुरक्षित आहे काय असा सवाल अनेक नागरिकांना महिलांना पडू लागला आहे.
संपूर्ण देशामध्ये लैंगिक अन्याय अत्याचार या विरोधात संतापाची लाट पसरलेली असताना इंग्रजी खाजगी शाळेतील अमोल लोंढे नावाच्या नशेच्या गोळ्या देत सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी वर वारंवार अत्याचार केले.
सदर शिक्षक हा कोरपणा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष असल्याचे समजते सदर अत्याचाराचा गुन्हा कोरपणा पोलीस स्टेशन येथे नोंदवला गेला याची चाहूल लागतातच आरोपी अमोल लोंढे हा मुंबईला पडून जाण्याच्या बेतात असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी याबाबत गुन्हे शाखेला निर्देश दिले पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तात्काळ आरोपी हा अकोला बस स्थानकावर असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली या घटनेमुळे कोरपना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेली असून आरोपीला फाशी द्या अशी मागणी जनसामान्य नागरिक करीत आहे.
घटनेच्या निषेधार्थ आज कोण कोण आहे इथे शाळकरी मुलांचा निषेध मोर्चा काढण्यात आला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी अमोल लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र सुद्धा जारी केले मग का सुदर्शन यांनी या प्रकरणात अजून कोणी पिढीत असेल तर त्यांनी पुढे एक तक्रार करावी असे आव्हान केले असून पोलीस यंत्रणा वातावरण नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत आहे.