✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.सप्टेंबर) :- गावातील सामाजिक कार्यात तन मन धनाने सदैव तत्पर असणारे स्वर्गीय अनिल गुलाब पोईनकर यांच्या प्रथम स्मृति प्रित्यर्थ ग्रामपंचायत खेमजई, मित्र परिवार मंडळ व जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 ला दत्त मंदिर खेमजई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत खेमजई गावामध्ये अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहे, गेल्या सहा वर्षापासून आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत खेमाजई च्या वतीने करण्यात येत आहे. स्वर्गीय अनिल गुलाब पोईनकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रमोद गंपावर सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते झाले.
डॉ. सतीश अगडते पशुधन विकास अधिकारी, चंद्रहास मोरे उपसरपंच खेमजई, संतोष गुजर,व्यवस्थापक वाडी प्रकल्प नाबार्ड, ईश्वर टापरे सहाय्यक शिक्षक खेमजई, संजू जांभुळे सहाय्यक शिक्षक इत्यादी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. शिबिरात खेमजई,भटाळा व परिसरातील 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्याचे ग्रामपंचायत कडून स्वागत करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रक्तदात्यांना जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर वतीने प्रमाणपत्र,वॉटर कॅन वाटप करण्यात आले तसेच चला बदल घडवूया या सामाजिक उपक्रमांतर्गत डॉ. चेतन खुटेमाटे, विदर्भातील नेत्र तज्ञ यांच्याकडून टी-शर्ट वाटप करण्यात आले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी राजू श्रीरामे,देवेंद्र दडमल, प्रशांत पोईनकर, रमेश चौधरी, निखिल पोईनकर, किशोर पोईनकर,विनोद पोइनकर आणि हितेश नन्नावरे बोरगांव शी. इत्यादींनी सहकार्य केले.