🔸करपा , बुरशीचा वाढला प्रादुर्भाव : दलदलीमुळे शेतकऱ्यांचे उपाय चालेना
✒️मनोहर खिरटकर (खांबाडा प्रतिनिधी)
खांबाडा (दि.8 ऑगस्ट) :- सततच्या पावसाचा खरीप पिकांना चांगलाच फटका बसला . त्यामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी पिकांच्या व्यवस्थापनेच्या कामात अती ओलाव्यामुळे व्यत्यय येत असल्याने शेतकरी बेजार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात पावसाने वर्षाची सरासरी गाठली असून पावसाची स्थिति अनुकूल आहे.
सध्यातरी सगळीकडे शेतशिवारात पाणीच पाणी असल्याची परिस्थिती कायम आहे . परिणामी अती ओलाव्याने पीक आजारी पडले असून मूळ कुज ,बुरशी, करपा आदि रोगाला बळी पडत आहे. अश्यातच शेतकरी पीक वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतांना पाऊसात खंड नसल्याने शेतातील दलदलीत कश्या पद्धतीने उपाययोजना कराव्या हा शेतकर्यासपुढे प्रश्न उभा ठाकला आहे. अश्या परिस्थितीत पिकांची झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
सध्या पिकात तणे वाढलेली असल्याने तन व्यवस्थापणासाठी शेतकर्याची लगबग सुरू आहे. मात्र मजुरांची मजुरी गगनाला भिडली तर दुसरीकडे बाहेरगाव वरुन येणार्यास मजुरांच्या भरोवश्यावर निंदनाचे काम अवलंबून आहे. सध्या 250 रुपये निंदण मजुरी आणि वाहन खर्च अतिरिक्त शेतकर्यांनना द्यावा लागतो आहे.फवारणीच्या मजुरांची मजुरी पाचशे ते सहाशे रुपये द्यावी लागत आहे. मात्र अती ओलावा असल्याने तन व्यवस्थापनाची कामे पण खोळंबली आहे.
सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली . विविध रोगाने पीक ग्रासले. बुरशीजन्य रोगाने पीक करपले यामुळे पिकांच्या संरक्षणसाठी आणि रोग नियंत्रणासाठी शेतकर्यां ना अतिरिक्त खर्च करावे लागतो आहे. यावर्षी उत्पादन खर्चात कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्पादनात कमालीची घट होण्याचे चिन्ह आहे. अती ओलाव्यामुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता तालुक्याला ओला दुष्काळ घोषित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
सततच्या पावसाने शेतात अती ओलावा निर्माण झाला आहे. खोलगट जमिनीत पाणी साचलेले आहे.त्यामुळे कापूस पिकात मूळकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकर्यांरनी वेळीच उपाययोजना कराव्या यासाठी जनजागृती केली जात आहे. श्री ए .डी.आरु, सहायक कृषीअधिकारी खांबाडा.
तालुक्यात अती पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार साहेबाने कडून पंचनामे करण्याच्या सूचना केलेल्या आहे. खांबाड सांजा सततच्या पावसाने सर्वात जास्त नुकसान झाले पंचनामे करण्याची प्रक्रिया पुर्ण करून तशी माहिती वरीष्ठाकडे पाठवली आहे. प्रशासन पातळीवरून कार्यवाही सुरु आहे. तसे वरिष्ठांचे सुद्धा आदेश आहे. आणि दोन महिण्यात आपल्या मंडल मध्ये ६५%चे वर पावसाची नोंद झाली आहे .आर .व्हि.टिपले तलाठी खांबाडा सांजा क्रं २२