🔹त्यांची आंदोलने, मोर्चे व अन्यायपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा का ठरताहेत लक्षवेधक
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.30 जुलै) :- असं म्हटल्या जातं की “मागितल्याने भीक मिळते आणि संघर्ष केल्याने अधिकार मिळतात.” अगदी असंच संघर्षशील नेतृत्व राजू कुकडे यांच्या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात उदयास आलं आहे, पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीने वादळ निर्माण करणारे राजू कुकडे राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा मागे नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन 2007 पासून सक्रिय आहे.
दरम्यान त्यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक व आता वरोरा भद्रावती या विधानसभेचे प्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी गोरगरीब शेतकरी बांधव यांच्या हक्कासाठी जो लढा उभारला आणि त्यासाठी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा उपक्रम राबविला तो वाख्यांनाजोगा आहे. अर्थात गोरगरिबांचा व शेतकऱ्यांचा तो नेता आहे हे आता या क्षेत्रातील जनता मान्य करत आहे.
राजू कुकडे यांची पत्रकारिता व राजकारणात नेहमीच वादळी भूमिका राहिली आहे, जिल्हा प्रेस क्लब मध्ये गोरगरीब, अन्यायपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कित्तेक पत्रकार परिषदा घेतल्या आहे, विशेष म्हणजे वर्षाभरात सर्वात जास्त पत्रकार परिषदा घेण्याचा त्यांचा उच्चांक आजही अबाधित आहे.
उच्चशिक्षित असलेले राजू कुकडे यांना कायाद्याचे ज्ञान आणि त्यांचे प्रखर वक्तृत्व यामुळे त्यांचा जिल्ह्यात चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, कुणाचे कुठलेही काम असो नाही म्हणुन त्यांचा शब्द नसतोच, मग पोलीस स्टेशन चे काम असो की दवाखान्याचे. अगदी नम्रपणे वागणारे राजू कुकडे हे कुणावर अन्याय झाला तर ज्वालामुखी बनून अन्याय करणाऱ्यावर तुटून पडतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे कित्तेक लोकं समस्या घेऊन येतात आणि ते त्यांना न्याय मिळवून देतात. त्यामुळे एकदा का त्यांच्याकडे विषय गेला की समोरच्यांची जाम फाटते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ते कार्य करीत असताना इतर पदाधिकारी यांच्या तुलनेत राजू कुकडे यांची नेहमीच सरसी झाली आहे, पण मुंबईची नेते मंडळी आली की समोर समोर करायचे आणि जणू आपणच सर्वेसर्वा आहो असा देखावा करण्याचा काही मंडळीचा घाट असतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत सन 2018 मध्ये जिल्ह्यात त्यांनी काढलेली “मराठी युवा जागर यात्रा,” व यावर्षी एप्रिल मध्ये काढलेली “नवनिर्माण जागर यात्रा.” या यात्रा पक्षाला नवचेतना देणाऱ्या ठरल्या आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विम्याचे पैसे व अतिवृष्टी ची नुकसान भरपाई करिता त्यांनी केलेली अनेक आंदोलने यामुळे त्यांच्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाला आहे, जिथे कुठूनही न्याय मिळत नाही तिथे राजू कुकडे कडे मिळतो अशी सर्वत्र चर्चा होतं असल्याने राजू कुकडे यांच्या दर सोमवारला वरोरा येथील मनसेच्या “राजगड” या जनसंपर्क कार्यालयात होणार जनता दरबार लक्षवेधी ठरत आहे.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात यावेळी मनसेचा आमदार
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारे राजू कुकडे यांनी गावाखेड्यावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे व मागील वेळी मनसेच्या उमेदवाराने जी 35 हजार मते घेतली त्यात मोठी भर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, अर्थात भाजप कांग्रेस उमेदवारांच्या तुलनेत राजू कुकडे यांना जनतेत चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
आर्थिक दृष्टीने कमजोर असतांना सुद्धा जनतेत त्याची क्रेज असल्याने या निवडणुकीत गरिबांचा सर्वसामान्य उमेदवार म्हणुन जनता त्यांना डोक्यावर घेऊ शकते आणि जनतेने एकदा का निवडणूक हातात घेतली तर मग पैसे वाटणारे, गडगंज पैसेवाले त्यांच्यासमोर हवालदिलं होतील अशीच परिस्थिती दिसत आहे, त्यातच सगळ्या राजकीय पक्षाच्या संभावित उमेदवारानी गावागावात प्रचार सुरू केला आहे त्यात कुणी पावसाच्या छत्र्या वाटप करीत आहे तर कुणी चष्मे रेनकोट वाटप करीत आहे मात्र याही परिस्थितीत राजू कुकडे हे तालुका स्थरावर शेतकऱ्यांचे गरीब जनतेचे प्रश्न जनता दरबारातून सोडवीत आहे.
त्यामुळं राजू कुकडे गरिबांचा नेता म्हणुन प्रसिद्ध होतं असून त्यांच्या बाजूने लॉट तयार झाली तर करोडपती उमेदवरांचे सुद्धा डिपॉझिट जप्त होऊ शकते व राजू कुकडे हे निवडून येऊ शकते. त्यामुळं यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसेचा आमदार निश्चितपणे होऊ शकतो असे चित्र दिसत आहे.