🔸महिलांना पाण्यासाठी करावी भटकंती
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.11 फेब्रुवारी) :- तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओडख असलेली शेगाव बु हे गाव. गावात शाळा, कॉलेज, दवाखाने सगडी सुविधा असली तरी आजही या गावातील नागरिकांना पिण्याच्या पान्यासाठी भटकंती करावी लागते. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी २ पाण्याच्या टाक्या असल्या तरी उन्हाळा असो वा पावसाळा कधीच दररोज पाणी पुरवठा केल्या जात नाही.
उन्हाळ्यात तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर असते लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी १०/१२ दिवस नळाची वाट बगावी लागते. परंतु सध्या उन्हाळा नसताना सुद्धा मागील काही महिन्या पासून गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मागील महिन्या भरात एकदाही नळाला पाणी न आल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत या कडे मात्र दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावातील लोकांना मात्र पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
एकीकडे केंद्र सरकारची घरघर नळ योजना राबविली जात असताना त्या योजनेला सुद्धा ब्रेक लागला आहे. मागील काही महिन्या पासून या योजनेचे काम सुद्धा ठप्प झाले आहे. या मुळे शेगाव गाव वासियांची पिण्याच्या पाण्यासाठी असलेली भटकंती संपणार तरी कधी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.






