अभिजित प्रभाकरराव कुडे नागरी– माढेली सर्कल मधून होत आहे सक्रिय

Share News

🔹अभिजीत च्या सक्रिय भूमिका व कामामुळे विरोधकांना फुटला आहे आतापासून घाम 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.30 नोव्हेंबर) :- अभिजित कुडे हे सामजिक संघटनेत काम करत असताना समाजकार्याला कुठेतरी राजकारणाची जोड देत त्यानी गेल्या दोन वर्षांत आपल्या कार्य कौशल्य व संघटन कौशल्यच्या जोरावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा युवा अधिकारी पद मिळविले . वेळोवेळी शेतकरी, अपंग, विद्यार्थि , कामगार, रस्त्याने, सर्व सामान्य माणसाचे प्रश्न आपल्या शांत स्वभावाने व तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लावून धरले. मग शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडीत झाला त्या बद्दल असो, ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा, रस्त्याने वेगळे वेगळे आंदोलन, अपंग निधी प्राप्त करून देण्यासाठी आंदोलन असो , निराधार योजना, विविध स्पर्धा आयोजित केल्या, रक्ताची गरज असो, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली.

कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप, घरकुल योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड , अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू असते, विशेष शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यश– अपयश पदरी पडत गेले या प्रामाणिक हेतूने समाजहिताचे कार्य सूरू आहे शिवाय अभिजित चे शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे व त्यांचे ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे अस बोलले जात आहे.

सध्याचं राजकीय वातावरण बघता या तरुण चेहऱ्याला कितपत पसंदी मिळतेहे बघणे अधिक सार्थ ठरणार आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे एक युवा, निष्कलंक व तडफदार नेतृत्व म्हणुन बघितले जात आहे. अभिजित ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे. त्याच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना विधानसभा युवा अधिकारी पद देण्यात आले.

दिग्गज नेत्यांच्या विरोधात एक तरुण असे चित्र या भागात तयार झाले आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेलं हे घराणेशाही, व भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला अस ते सांगत होते. या भागातील प्रश्नांना घेऊन अभिजित नी अनेक आंदोलन केलं , केसेस दाखल झाल्या एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी धडपड करत असतो. लोकांनी साथ दिली तर नक्कीच या भागाचा कायापालट होणार असे अभिजित कुडे नेहमी सांगत असतात .

ज्यांनी कधी एक केलें नाही कधी लोकांचे प्रश्न सोडविले नाही फक्तं पैश्याच्या जोरावर निवडणुकीत उतरणार आहे त्यांना अभिजित च्या उमेदवारी मुळे जबर धक्का बसला आहे. अतिशय कमी काळात च अभिजीतने ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे . जिल्हा परिषद निवडणुकीत अभिजीत चे नाव चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर सर्व सामान्य माणसाची अभिजित ने ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे .

 २३ वर्षीय अभिजित कुडे आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणूकीच्या रिंगणात जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच माढेली नागरी जिल्हा परिषद मधून अभिजित कुडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरले. अभिजित कुडे उखर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे.. तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. सर्व सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे. न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. युवकांना एकत्र घेत दिशा देण्याचे काम करत आहेत.

माढेली रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहे ,14 निवेदन 7 आंदोलन करून त्यांनी रस्त्याची डागडुजी करून घेतली व रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष अजून सुरू च आहे .त्यांच्या आंदोलनाला संघर्षाला यश मिळाले असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही काम असो त्यासाठी अभिजित कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम करून देतो कित्येक शेतकऱ्यांचे थकलेले हप्ते, विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा पाठपुरावा करून नसेल ऐकत तर आंदोलनाचा इशारा देत मागण्या पूर्ण केल्या.

अपंगाच्या निधी असो त्यांचे प्रश्न असो, निराधार लोकांचा आधार अभिजित झाला आहे. परिसरातील च नाही तर तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य कसे करता येणार या साठी ते प्रयत्नशील असतात. लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असे त्याने सांगितले. लॉक डाऊन मध्ये मजुरांना अन्य धान्य किट वाटप केले . मुलांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील वर्ग 1 ते 8 चे 70 विद्यार्थांचे वर्ग निःशुल्क सुरू केले. वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली. My village my vision अंतर्गत वृक्ष लागवड व गावाचा सर्वांगीण विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत. कोणताही व्यक्ती त्यांच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे.

नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत. लोकांच्या मनात त्यांची वेगळी छाप पडली आहे. सर्व सामान्य माणसाला. शेतकरी, अपंग व्यक्ती, निराधार यांचा अभिजित ला पाठिंबा आहे. युवकांमध्ये अभिजित चे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे अनेक युवक त्यांच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलन करुन ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात. अधिकाऱ्यांवर त्यांची वचक आहे कारण ते अभ्यासू, कार्यश्रम व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे.

अभिजित ने निवडणुकीत मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे.कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून, जबाबदारी स्विकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवून प्रगती करणे होय…. याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करतात. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी अभिजित जीवाचे रान करून घेतो. 

उखर्डा नागरी रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष सर्वानी बघितले आहे त्या नंतर हा निकृष्ठ दर्जाचे काम बघून तो बेधडक भिडला . 43 आंदोलन करून अनेक रस्त्याचे काम मंजूर करून घेतले आहे. सर्व सामान्य माणसाला त्याच्यात एक हक्काचा माणूस दिसतो. समस्या कोणताही असो लोक अभिजित कडे येतात. युवकांनी त्याचे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे. प्रत्येक गावातील 15,20 युवकांचा त्याला पाठींबा आहे. पुरुष सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. महिला वर्गातून चांगला प्रतिसाद आहे. अभिजीत परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

अभिनव संकल्पना आणि जिद्द चिकाटी मेहनत प्रामाणिक प्रयत्न लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत जावून काम करण्याची धडपड यामुळे अभिजित कुडे या युवकाला लोकांनी डोळ्यावर घेतले आहे. त्याचा जनसंपर्क बघून प्रस्थापित पुढाऱ्यांना आतापासून घाम फुटला आहे. एक तरुण सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा त्यामुळे अभिजित ला लोकांची पसंती दिली आहे.

Share News

More From Author

ना.सुधीर मुनगंटीवार(sudhir Mungantiwar)करणार नागरिकांच्या तक्रारीचे निवारण

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *