किशोर टोंगे यांचे शिष्टमंडळ सोयाबीन घेऊन उपविभागीय कार्यलयात धडकले  Kishore Tonge’s delegation stormed the Sub-Divisional Office with soybeans

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.20 सप्टेंबर) :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते किशोर टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्टमंडळ आज सोयाबीन घेऊन उपविभागीय कार्यालयात धडकले.

वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकावर आलेल्या रोगामुळे पीक हे पूर्णता पिवळे पडून वाळायला लागले आहे. सोयाबीच्या ३३५ या जड वाणाचे सोयाबीन हे १००% खराब होऊन ते नापीक झाले आहे. ९३०५ हलके वाण असून ते ८० ना पीक झाले आहे.

मागील चार पाच वर्षापासून कापूस या पिकाला बोन्डअळी चा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात केली असून सोयाबीन चे चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु अति पावसामुळे अनेक प्रकारचे रोग सोयाबीन वर येऊ लागले आणि सोयाबीन हे पीक होतेचे नव्हते करून गेले त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून तो प्रशासनाची मदत मिळेल या आशेवर आहे.

यासाठी किशोर टोंगे यांच्या शिष्ट मंडळाने शासनाने प्रति एकरी तात्काळ ५१ हजार रुपये अशी मदत जाहीर करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

यावेळी शिष्ट मंडळात युवा कार्यकर्ता शुभम आमने, बंडू वरारकर, शुभम पिजदूरकर, साहिल मोडक, प्रवीण बदखल, यश आवारी, विजय चिकटे,कौशल कुमरे, वृषीकेश धानोरकर, मयूर पिजदुरकर,आकाश तुरारे, इ. उपस्थित होते.

Share News

More From Author

वरोरा तालुक्यातील शेगाव चारगाव परिसरातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार Compensate the farm in Shegaon Chargaon area of Warora taluka and pay compensation…Prahar Sevak Akshay Bondgulwar

बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा…वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Increase the reputation of the district in the bamboo sector…Forest Minister Sudhir Mungantiwar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *