ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात  The future of students is in darkness due to the mismanagement of the Energy Department

Share News

🔹 एकाच दिवशी दोन ठिकाणी एकाच विद्यार्थ्यांची परीक्षा : परीक्षा थांबवून चूक सुधारा(Examination of the same students at two places on the same day : Correct the mistake by stopping the examination)

🔸खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती  ( MP Balu Dhanorkar’s request to Energy Minister Devendra Fadnavis )

✒️सुनील चटकी चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि. 23 एप्रिल) : –

            महाराष्ट्र राज्य वीज वितरण निर्मिती कंपनी मर्यादित द्वारे असिस्टंट इंजिनिअर इलेक्ट्रिकल व ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अचानक ५ दिवसाअगोदर परीक्षा जाहीर केली.

२७ एप्रिल ला सकाळी ७.३० व ११.३० वाजताचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याउपरही अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऐच्छिक सुचविलेले परीक्षा केंद्र न देता ५०० ते ९०० किमी दूरवरची परीक्षा केंद्रे देण्यात आली.

असिस्टंट इंजिनिअर व ज्युनिअर इंजिनिअर दोन्ही साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना जाणूनबुजून वेगवेगळी केंद्रे देण्यात आली. त्यामुळे दोन्ही पदांसाठी परीक्षा देणाऱ्यांना अडचण निर्माण झाली. अनेक वर्षांपासून परीक्षेची वाट बघणाऱ्या उमेदवारांना खर्चिक व अडचणींच्या अटी शर्तींमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागेल. 

तसेच २६ एप्रिल ते २८ एप्रिल याच कालावधीत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, मध्य प्रदेश जनरेशन कंपनी या देखील परीक्षा व मुलाखती आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या परीक्षा त्वरित समोर ढकलून उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Share News

More From Author

वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा Immediately report the loss of farmers and citizens due to stormy rains

विठ्ठलजी रामकृष्ण हनवते मित्र परिवार व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टि) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न A career guidance seminar was held at Chandankheda in association with Vitthalji Ramakrishna Hanwate Mitra Parivar and Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *