✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.3 मे) :-

शुभम जाधव यांनी दहावीमध्ये 73 टक्के तर बारावीमध्ये 65 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांनी आपले दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण स्व. मोहन चव्हाण VJNT हायस्कूल, वडगाव येथे पूर्ण केले.
पोलीस भरतीसाठी त्यांनी दोन वेळा प्रयत्न केले. पहिल्या प्रयत्नात केवळ 3 गुणांनी त्यांची निवड हुकली होती. मात्र, त्यांनी हार न मानता दुसऱ्या प्रयत्नात नागपूर येथे झालेल्या भरती प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केली. ग्राउंडमध्ये 43 गुण आणि लेखी परीक्षेत 85 गुण मिळवत त्यांनी यश संपादन केले.
विशेष म्हणजे, शुभम जाधव यांची ओपन गटातून निवड झाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून येणाऱ्या शुभम यांचे वडील शेतकरी असून, त्यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.







