मनसेच्या पुढाकाराने उद्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा बैलबंडी आक्रोश मोर्चा On the initiative of mns, farmers’ Bullock cart protest march for loan waiver tomorrow

Share News

🔸बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.14 मार्च) :- जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही.

जवळपास 2000 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार प्रोत्साहन राशी मिळाली नाही तर 3 हजार शेताकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून काही बैंक व्यवस्थापकांनी शेताकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरा अन्यथा तुमचे बैंक अकाउंट शील करू अशी धमकी दिली आहे तर काही शेतकऱ्यांची बैंक खाती शील सुद्धा करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठा आक्रोश असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा पिडीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे व सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय व्हावा याकरिता दिनांक १५ मार्च ला बैलबंडी मोर्चातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन वरोरा मनसे तर्फे करण्यात आले आहे. 

15 मार्चला होणाऱ्या या बैलबंडी मोर्च्यात मोठ्या संखेने शेतकरी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शेतकऱ्यांचे नेत्रुत्व करणारे भदुजी गिरसाळवे, मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, गजू वादाफळे, मोहित हिवरकर, श्रीकांत तळवेकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर.

संदीप मोरे, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, पंकज पेटकर, मनोज गाठले, युगल ठेंगे,पवन ढोके, जयंत चौधरी, सुभाष बाटबरवे ,शंकर क्षिरसागर, दिलीप उमाटे, प्रतीक मुडे, मनोहर खिरटकर अनिल दोमणे, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, प्रमोद हनवते, अशोक दाते, दिनेश जुमडे, शुभम नरड, संदीप धानोरकर, राजु पवार, प्रकाश धोपटे, विष्णू मुंजे, आसिफ शेख, अनिकेत गुजरकर, महिला सेना रेवती इंगोले, पोर्णिमा शेट्टी, शुभांगी मोहरे, अनिता नकवे, ज्योती मुंजे यांनी केले आहे.

Share News

More From Author

भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अविरोध Bhadravati taluka urban cooperative çredit union president voice president unopposed

मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला Bullock Bundi march of mns stormed the tahshil office

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *