🔹सर्व पक्षीय बैठकीत आवाहन
🔸ठेवीदारांना पाच लाखापर्यंत रिझर्व बँकेच्या नियमानुसार सुरक्षा
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 ऑक्टोबर) :-
22 ऑक्टोबर रोजी पुसद विश्रामगृह येथे पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्था या संस्थे मधून ठेवीदार आपली ठेवी काही अफवेच्या कारणास्तव काढत असल्यामुळे त्यांना आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली. या मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
पुसद तालुक्यात ४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुसद अर्बन कॉ ऑप बँक व २३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारती मैंद पतसंस्थे मार्फत बैंकिगच्या अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा दिल्या जातात. दोन्ही संस्था मार्फत छोट्या व्यावसाईका पासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज, गृहकर्ज, शिक्षण कर्ज अडीअडचणी मध्ये पाहिजे तेव्हा कर्ज सुविधा दिली जाते. संजय गांधी, लाडकी बहीण सारख्या शासकीय योजनाच्या हजारो लाभार्थी खातेदारांना पुसद अर्बन बँक तत्पर सेवा देत असते. दोन्ही संस्थां मध्ये व्यापारी,सर्व पक्षीयकार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. बँक व पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांना आज पर्यंत त्यांच्या ठेविवरीत व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितली तेव्हा पाहिजे तितकी रक्कम पुरविली आहे.दोन्ही संस्थां मध्ये सर्व काही सुरळीत सुरु असतांना मागील महिन्यात दोन्ही संस्थांमधील ठेवीदारां मध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरु केले.
ज्या ठेवीदाराच्या भक्कम पाठिंब्यामुळे संस्था उभ्या आहेत, त्यांनीच अचानक ठेवी काढणे सुरु केल्याने बैंक व पत्तसंस्थाच्या दैनदिन व्यवहारावर विपरीत परिणाम पडत आहे. ठेवीदारांच्या गैरसमजुतीतुन विड्राल होत असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या दोन्ही संस्थाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तसे झाल्यास आपल्या भागात बैंकिंगची सेवा देणाऱ्या हक्काच्या संस्था आपण गमावून बसु, दुरगामी परिणाम करणाऱ्या या घटनेला रोखण्यासाठी पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवावा असे आवाहन पुसद विश्राम गृहावर झालेल्या सर्व पक्षीय बैठकीतून करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या सामूहिक पत्रकातुन वरील आवाहन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला नारायण शिरसागर, ॲड.उमाकांत पापीनवार, डॉ. मोहम्मद नदीम,राजन मुखरे,राजेश साळुंके,पंजाबराव खडकेकर,भगवान आसोले,निशांत बयास,मो. ईरफान मो.फयान,नितीन भुतडा, निखिल चिद्दरवार,अनिरुद्ध पाटील,नाना बेले,निलेश पेन्शनवार, डॉ.अकील मेमन,सुरज डुबेवार, संजय बजाज, बाळासाहेब पाटील कामारकर, अनुकूल चव्हाण, विनोद जिल्लेवार, निखिल ठाकरे, गणेश पवार, निखिल गादेवार,अभिजीत पानपट्टे, ओमप्रकाश शिंदे, करण ढेकळे, जिया शेख, हरगोविंद कदम,वैभव देशमुख, ऋषिकेश पंडितकर,संग्राम देशमुख सह अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.







