श्री झूलेलाल देवजी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 

वरोरा(दि.3एप्रिल) :-

                  शहरात सकल सिंधी समाज बांधवांनी 30 मार्च रविवार रोजी श्री झुलाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाला विशेष मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

                29 मार्च रोजी सायंकाळी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि मध्यरात्रीनंतर केक कापून व फटाके फोडून श्री झूलेलाल देवजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

            30मार्च रोजी श्री झूलेलाल देवजी जन्मोत्सव निमित्त,सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि त्यानंतर आंबेडकर चौक येथे गुढीपाडवा सणा निमित्त समाजातर्फे शरबतचे वाटप करण्यात आले. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत पूजा अर्चना करण्यात आली व नंतर श्री झूलेलाल देवजी यांची रॅली काढण्यात आली. सायंकाळी लंगर (महाप्रसाद) चे कार्यक्रम यशस्वी रित्या सम्पन्न झाले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सिंधी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Share News

More From Author

कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क शासन कमी करणार  असल्यास शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हूणन शासनाचे काय धोरण आहे ?  खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा संसदेत सवाल

एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी….आमदार सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *