🔸नातेवाईकांचा पत्रपरिषदेमध्ये आरोप
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.31 मार्च) :- ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी येथील अमित विश्वनाथ तुपटे याचा मृतदेह 6 मार्च 2025 ला गावाजवळील विहिरीत आढळून आला होता.ज्या विहिरीत प्रेत आढळून आले त्या विहिरीच्या पाण्याची पातळी फक्त तीन फूट असणे, मृतकाच्या मोबाईल वर गावातील एका मुलीचे फोन कॉल,मृतकाच्या घरी त्याचे हस्ताक्षरात सापडलेली चिठ्ठी व त्या मधे प्रेम प्रकरणातून मृत्यू झाल्याचा उल्लेख , शवविच्छेदन अहवाला मधे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती,गावातील तीन लोकांकडून मृतकाच्या भावाला जीवे मारण्याची धमकी अशा अनेक कारणामुळे अमित तुपटेचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्याचा नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.सदर प्रकरणात ब्रम्हपुरी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून ते जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मृतक अमित तूपटे हा दिनांक 28 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता दरम्यान घरून बाहेर पडला तेव्हा पासून तो लापता होता.दुसऱ्या दिवशी तो लापता झाल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.मृतक लापता झाला त्या दिवसापासून घरचे व गावातील लोक गावच्या आजुबाजूच्या परिसरातील सर्व विहिरी शोधल्या .दिनांक 6 मार्च ला गावशेजारील एका शेतातील विहिरीत अमित तुपटेचा प्रेत आढळून आला.अमितचा मृत्यू ही आत्महत्या नसून प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा आरोप मृतकाच लहान भाऊ राकेश विश्वनाथ तुपटे,नातेवाईक कोलारी गावच्या सरपंच कांचन सोमेश्वर तुपटे व पती सोमेश्वर तुपटे सह इतर गावकरी यांनी पत्रकार परिषदेत केला.
मृतकाचे प्रेत ज्या विहिरीत सापडले त्या विहिरीत पाण्याची पातळी अतिशय कमी असून त्याच्या लगतच्या शेतातील गहू पिकाची खुंदवड झालेली होती तसेच त्या जागेजवड एका दुचाकीचे फुटलेले टपर मिळाले.विहिरी जवळच्या तणशीच्या ढिगाऱ्याची दुर्गंधी येत होती.त्यामुळे तानशीत लपविलेले प्रेत तेथून काढून विहिरीत टाकण्यात आले असावे यातूनच तो तनशीच्या ढीग पेटवून देण्यात आला आहे अशी खात्री लायक माहिती असल्याचा नातेवाईकांचा आरोप असून सदर माहिती पोलिसाना सांगून सुद्धा अद्याप पोलिसांनि साधी संशय असलेल्यांची चौकशी केली नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मृतक अमितचा भाऊ अविनाशला गावातील तीन लोकांनी दिनांक 11 व 14 ला रस्त्यात अडउन तू घरच्यांना चिठ्ठी काहून दाखविलास तुझ्या भावाचे हाड तरी दिसले तुझे हाड सुद्धा दिसणार नाही अशी धमकी दिली तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेल्याने सदर प्रकरणात घातपाताचा दाट शक्यता आहे.मृतकाचे पुरलेल्या शरीराचे दुसऱ्यांदा शव विच्छेदन करण्यात यावे अशी मागणी मृतकाच लहान भाऊ राकेश विश्वनाथ तुपटे,नातेवाईक कोलारी गावच्या सरपंच कांचन सोमेश्वर तुपटे व पती सोमेश्वर तुपटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.