✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.30 मार्च) :- तालुक्यातील अंबादास चामाटे धनगर हे व्यक्ती जगण्यासाठी उदरनिर्वाह म्हणून बकऱ्यांच्या व्यवसाय करतात. त्यांच्या कडे जवळपास चाळीस बकऱ्या गोठ्यात होत्या. दररोज प्रमाणे दिवसभर बकऱ्या चारून सायंकाळी सहा वाजता गोठ्यात बांधल्या. आणि रात्री पहारेकरी म्हणून स्वतः गोठ्या जवळ झोपायला गेले.सकाळी पहाटेचे झाली चार वाजता गोठ्यातून घराकडे गेले व सहा वाजता गोठा साफ करण्यासाठी परत आले. परंतु संपूर्ण बकऱ्या गोठ्या बाहेर काढल्या नंतरअसे आले की लक्षात कुठे तरी आपल्या बकऱ्या गायब झाले असे निर्दशनात आले.
त्यावेळी अंबादास चामाटे यांच्या आपल्या बकऱ्या चोरी तर नसेल झाल्या म्हणून गावकर्यांना गोळा केले. तब्बल पन्नास हजारचा माल चोरीला गेला या गोष्टीच खुप दुःख सुद्धा झाले. त्यांनी मदत म्हणून पोलीस स्टेशन वरोरा येथे धाव घेउन लेखी तक्रार दिली. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे. परंतु चोरीची ही घटना वरोरा तालुक्यात ग्रामीण भागात खुप प्रमाणात वाढली काही दिवसापूर्वी मांगली, टेमुर्डा इथून सुद्धा बकऱ्या चोरी झाल्याची चर्चा आहे.
तालुक्यात जनावरे चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात शेतकरी व मेंढपाळ लोकांचे खुप नुकसान होत आहे तरी पोलीस खात्याने सखोल चौकशी करून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला लवकरात लवकर पकडावी अशी तालुक्यातील शेतकऱ्याची व मेंढपाळ्याचि पोलीस प्रशासनाला मागणी आहे.