🔸चारगाव बु. गावात व परिसरात सर्रास दिनदहाडे रेतीची तस्करी
🔹वनरक्षक करतात यांची पाठ राखण
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.30 जानेवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बु. या परिसरातील रामदेगी वायगाव अर्जुनी या जंगल लगत असलेल्या नदीतून सर्रासपणे दिनदहाळे मिळेल त्या वेळामध्ये रेतीची तस्करी जोमात सुरू आहे तर यावर चौकशी केली असता वन विभाग यांच्या हद्दीत येत असलेल्या रामदेगी येथील वनचौकी येथील कर्मचारी कोवर विभाग तसेच बफर विभाग चे वनरक्षक कर्मचारी यांच्याच आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे तस्करी होत असल्याची कानावर ऐकू येत आहे.
तेव्हा हे वनविभाग कर्मचारी वनरक्षक रेती तस्कर यांच्याकडून मासिक महिना 20 ते 25 हजार रुपये महिना घेत असल्याची चर्चा गावात परिसरात सुरू आहे त्यामुळे येथील रेती तस्कर आपली मनमानी करून गोरगरीब जनतेकडून एका ट्रॅक्टर मागे पाच ते सहा हजार रुपये घेत असतात व गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक करून आपली दिवाळी साजरी करतात. परंतु या गंभीर समस्या कडे संबंधित विभाग महसूल विभाग पोलीस विभाग यांचे दुर्लक्ष कसे यावर सुद्धा नागरिकांचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून चारगाव बु. तसेच या परिसरामध्ये रेतीची तस्करी जोमात सुरू असून या रेती तस्करावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल पाण्यात बुडत असून शासनाच्या तिजोरीला करोड रुपयाचा फटका बसत आहे. करिता या परिसरात सर्रास सुरू असलेली वाहतूक बंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.